Pooja Khedkar Case मुळे सरकारी नोकर भरती प्रक्रियेत केले मोठा बदल, आधारबद्दल काय आहे नवा नियम?
IAS पूजा खेडकर या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. त्यांना महाराष्ट्र केडर देण्यात आलं. प्रशिक्षणानंतरच्या पहिल्या पोस्टिंगपासूनच त्या वेगवेगळ्या कारणांमुळे वादात साडपल्या होत्या.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पूजा खेडकर प्रकरणानंतर प्रशासनानं घेतला धडा
सरकारी नोकर भरती प्रक्रियाेत मोठा बदल
2024 हे वर्ष आता संपत आलंय. यावर्षी राज्यात आणि देशातही स्पर्धा परिक्षांमध्ये झालेल्या एका प्रकरणाची मोठी चर्चा होतेय. हे प्रकरण म्हणजे IAS पूजा खेडकर प्रकरण. अनेक महिने यावर चर्चा झाली. मात्र, त्यानंतर आत या प्रकरणामुळे UPSC परीक्षेत अनेक बदल करावे लागले आहेत. त्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेतील घोटाळे रोखण्यास मदत होणार आहे.
ADVERTISEMENT
भरती परीक्षेत एका ठराविक काळानंतर नेहमी बदल केले जातात. त्यामुळे परीक्षेची पारदर्शकता कायम ठेवणं सोपं जातं. कधी हे बदल सामान्य असतात तर कधी काही वादग्रस्त बाबींमुळे घाईघाईने नवीन नियम बनवले जातात. यंदाही असंच काहीसं घडलं. एकीकडे IAS पूजा खेडकर आणि तिच्या आई-वडिलांनी केलेला घोटाळा उघडकीस आला, तर दुसरीकडे बिहारच्या बनावट आयपीएस अधिकाऱ्याचीही बरीच चर्चा झाली.
कोण आहे IAS पूजा खेडकर?
IAS पूजा खेडकर या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. त्यांना महाराष्ट्र केडर देण्यात आलं. प्रशिक्षणानंतरच्या पहिल्या पोस्टिंगपासूनच त्या वेगवेगळ्या कारणांमुळे वादात साडपल्या होत्या. आयएएससाठी निवड झाल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. याशिवाय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यासही बंदी घालण्यात आली होती. IAS होण्यापूर्वी पूजा खेडकर 2021 मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्यक संचालक होत्या.
प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी म्हणून पूजा खेडकर यांनी अनेक पराक्रम केले. त्यांनी त्यांच्या खासगी वाहनावर लाल दिवा लावला होता. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पोस्टिंग मिळाल्यावर त्यांनी परवानगीशिवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या दालनातही ताबा मिळवला होता. त्यानंतर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकर यांची नियुक्ती संशयास्पद असल्याचं सांगितलं. ओबीसी नॉन क्रिमीलेयरच्या श्रेणीबाहेर होत्या, पण त्यांनी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला होता. चौकशीत त्यांचं अपंग प्रमाणपत्रही बनावट असल्याचं निष्पन्न झालं होतं.
सरकारी नोकरीच्या नियुक्ती प्रक्रियेत मोठे बदल
बनावट वैद्यकीय आणि जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना सरकारी नोकरी मिळाल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांना बडतर्फ केलं होतं. ही बाब समोर आल्यावर केंद्र सरकारच्या नोकऱ्यांच्या प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले. पूजा खेडकर प्रकरणातून धडा घेत, UPSC ने सर्व भरतींमध्ये उमेदवारांची आधार पडताळणी अनिवार्य केली. आता आधार पडताळणीशिवाय कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. एसएससी आणि रेल्वे भरती परीक्षांमध्येही आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT