Ladki Bahin Yojana: बहिणींचे पुन्हा होणार लाड! खात्यात 4500 जमा? पण एकदा तुमच्या नावाची यादी तर पाहा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana third installement date declare aditi tatakare mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar
लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांची यादी आली समोर

point

यादीत तुमचं नाव आहे की नाही? हे तपासण्यासाठी काय करावं?

point

...तरच तुमच्या खात्यात 4500 रुपये होतील जमा

Mazi Ladki Bahin Yojana Third Installment Update :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. सरकाने लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता जमा केला असून तिसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. पण काही महिलांच्या खात्यात अद्यापही 4500 रुपये जमा झाले नाहीत. तर काहींच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत. अशातच आता लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या महिलांचं नाव आहे. त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. पण या यादीत नावाची नोंद होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याबाबत वाचा सविस्तर माहिती.

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवर गुगलवर जायचं आहे. गुगलवर तुम्हाला धुळे कॉर्पोरेशन सर्च करायचं आहे. धुळे कॉर्पोरेशन ओपन केल्यावर नवीन पेज उघडणार आहे. माझी लाडकी बहीण-लाभार्थी यादी धुळे म्युनसिपल कॉर्पोरेशन असा पहिला पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन पेजवर यादी डाऊनलोड करण्याचा विकल्प दिसणार आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला यादी डाऊनलोड करता येणार आहे.   

हे ही वाचा >> Gold Rate Today: अहो राव, काय आहे 'हा' सोन्याचा भाव! 15 प्रमुख शहरांतील आजचे दर वाचून धडकीच भरेल

ही यादी डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमचा अॅप्लिकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर आणि अर्जाची स्थितीची माहिती मिळेल. अशाप्रकारे तुम्हाला अॅप्लिकेशन नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
या पद्धतीने तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची यादी तपासता येणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकतर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगर पालिकेच्या वेबसाईटवर मिळेल किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. यादी सापडली नाही तर तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीणसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना या यादीबद्दल किंवा पैशांबद्दल विचारणा करता येणार आहे. त्यामुळे अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर ही यादी नक्की तपासा.

हे ही वाचा >> Vidhansabha Election 2024 : ठरलं! विधानसभेत मनसेचा झेंडा फडकणार? 'इतक्या' जागांवर लढणार निवडणूक

    follow whatsapp

    ADVERTISEMENT