सावधान! Whatsapp वर आलेला 'हा' मेसेज चुकूनही डाऊनलोड करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान
WhatsApp Wedding Invite Scam : सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्कॅमर्सने धुमाकूळ घातला आहे. बँक डिटेल्स आणि पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी पैसे चोरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
WhatsApp आलेलं 'हे' कार्ड अजिबात डाऊनलोड करू नका
WhatsApp Wedding Invite Scam : सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्कॅमर्सने धुमाकूळ घातला आहे. बँक डिटेल्स आणि पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी पैसे चोरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता स्कॅमर्सने लोकांचे पैसे लुटण्याचा नवीन पर्याय शोधला आहे. स्कॅमर्स आता व्हाट्सअॅपच्या माध्यमातून वेडिंग इनवाइट म्हणजेच डिजिटल वेडिंग कार्डच्या माध्यमातून लोकांचे पैसे लुटत आहेत. स्कॅमर्स वेडिंग सीजनमध्ये लोकांना डिजिटल इनवाइटचा मेसेज पाठवून त्यांची वैयक्तीक माहिती चोरण्याचा काम करत आहेत. तसच सायबर क्राईम डिपार्टमेंटनेही लोकांना अशा स्कॅमपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून डिजिटल वेडिंग कार्ड (इनवाइट) खूप प्रसिद्ध होत आहे. दूर राहत असल्याने ज्या लोकांना नातेवाईकांच्या घरी जाता येत नाही, असे लोक व्हाट्सअॅपच्या माध्यमातून वेडिंग कार्ड पाठवतात. त्यामुळे स्कॅमर्सने लोकांना लुटण्याचं हे एक साधन बनवलं आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्कॅमर्सने वेडिंग इनवाइट तयार केलं आहे. स्कॅमर्स व्हाट्सअॅपवर वेडिंग इनवाइटमध्ये एक APK फाईल पाठवत आहेत.
हे ही वाचा >> Ajit Pawar: "मुस्लिमांच्या भावना दुखावणार...", 'बटेंगे तो कटेंगे'वरून अजित पवार नेमकं काय म्हणाले?
तुम्ही या वेडिंग इनवाइटला क्लिक केलं की लगेच फोनमधअये मालवेयर डाऊनलोड होतं आणि स्कॅमर्स याच्या मदतीने तुमच्या वैयक्तीत माहितीचं अॅक्सेस घेतात. स्कॅमर्स तुमच्या वैयक्तीक माहितीच्या आधारे ऑनलाईन फ्रॉड करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही फाईल्सवर क्लिक करताना सावध राहा.
हे ही वाचा >> Asaduddin Owaisi: "लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले आणि 1900...", असुद्दीन ओवैसी नेमकं काय म्हणाले?
सायबर क्राईमने लोकांना अशा स्कॅमपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. जर कुणासोबत अशाप्रकारचं स्कॅम झालं, तर ते नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकतात. त्यामुळे अशाप्रकारची कोणतीही फाईल ओपन करण्याआधी सावध राहा.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT