Optical Illusion : भल्या भल्यांना नाही जमलं! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेला साप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical Illusion Test
Optical Illusion Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सापाचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

point

हुशार असाल तर १० सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेला साप

point

या फोटोत लपलेला साप शोधणं वाटतं तितकं सोपं नाही, पण...

Optical Illusion IQ Test :  ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. अशाप्रकारे फोटो डोळ्यांना चकवा देण्याचं काम करतात. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंना पाहिल्यानंतर अनेकांचा गोंधळ उडतो. या फोटोत नक्की काय लपलंय, हेच लोकांना समजणं कठीण बनतं. या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये खूपच कमी लोकांना यश मिळवता येतं. अशातच ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल झाला आहे. 

हा फोटो ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टसाठी योग्य उदाहरण आहे. या व्हायरल फोटोला नीट पाहा आणि या फोटोत साप नेमका कुठे लपला आहे, ते शोधून दाखवा. या फोटोत लपलेला साप शोधणं सोपं नाही. कारण हा साप शोधण्यात भल्या भल्यांना अपयश आलं आहे. पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, तेच फोटोत लपलेला साप शोधू शकतात. 

हे ही वाचा >> Today Gold Price : ग्राहकांसाठी 'सुवर्ण' संधी? गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या भावात झाले मोठे बदल 

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोला लोक खूप पसंत करत आहेत. या टेस्टमध्ये पास होणं, हे खूप मोठं आव्हान असल्यानं अनेकजण यात यश मिळवण्याचा प्रयत्न करतायत. आता तुम्ही या फोटोता खूप काळजीपूर्वक पाहा आणि या फोटोता साप कुठे लपला आहे, ते सांगा. पण तुम्हाला हा साप शोधण्यासाठी फक्त 10 सेकंदांचाच वेळ दिला गेला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फोटोत लपलेल्या सापला जितक्या लवकर शोधाल, तुमचं डोकं तितक्याच वेगानं काम करेल. या सापाला शोधण्यात काही लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. जर तुम्ही या फोटोला गरुडासारख्या नजरेनं पाहिलं, तर फोटोत लपलेला साप शोधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत असलेल्या गोष्टी नेहमीच आपल्या डोळ्यांसमोर असतात. पण ते आपल्याला दिसत नाहीत.

हे ही वाचा >> Daily Horoscope: प्रवास करताय? 'या' राशीच्या व्यक्तींनी आताच सावध व्हा, जाणून घ्या आजचं राशी भविष्य

या व्हायरल फोटोतही अशाच बारिक सारीक गोष्टी आहेत. ज्या पाहिल्यावर लोक गोंधळून गेले आहेत. जर कुणाला आय क्यू टेस्ट करायची असेल, तर त्याच्यासाठी हा फोटो एकदम योग्य उदाहरण आहे. हा व्हायरल फोटो खूप सामान्य आहे. पण यामध्ये लपलेल्या सापाला शोधणं कठीण आहे. त्यामुळे तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल. जर तुम्ही सापाला शोधू शकले नाहीत, तर तुम्ही खाली दिलेल्या फोटोत सर्कल केलेल्या ठिकाणी सापाला पाहू शकता. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT