काय हा प्रकार... अंतर्वस्त्रावर तरुणी-तरुणांचा मेट्रोमधून प्रवास

मुंबई तक

लंडनमधील तापमान उणे ३ अंशांपर्यंत होते.. अशातही मेट्रोमध्ये अनेक तरुणी आणि तरुणांनी चक्क विना पँट प्रवास केला. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय.

ADVERTISEMENT

अंतर्वस्त्रावर तरुणी-तरुणांचा मेट्रोमधून प्रवास (फोटो-X/NLakafosis71)
अंतर्वस्त्रावर तरुणी-तरुणांचा मेट्रोमधून प्रवास (फोटो-X/NLakafosis71)
social share
google news

No Trousers Day: लंडन: कंबरेच्यावर पूर्ण कपडे, पायात बूट आणि मोजे, पण फक्त कंबरेखाली अंतर्वस्त्रे. लंडन मेट्रोच्या या दृश्याने अनेकांना आश्चर्यचकित केलं. लंडनमधील तापमान हे शून्यापेक्षा कमी असताना देखील अनेक तरुणी आणि तरूण हे रविवारी विना पँट मेट्रोतून प्रवास करताना दिसून आले. (in minus 3 degree temperature young men and women traveled in london metro without trousers)

नेमका काय आहे हा प्रकार?

खरं तर, सण-उत्सवप्रेमी लंडनवासी रविवारी लंडन ट्यूब नो ट्राउजर डे साजरा करत होते. (London tube no trousers day)  म्हणजेच, ज्या दिवशी त्यांना लंडन मेट्रोमध्ये पँट, पायजमा घालायचे नाही असा दिवस. लंडनमधील मेट्रोला ट्यूब असं म्हणतात.

या मोहिमेत मुली आणि महिला देखील दिसून आल्या. आणि त्या देखील फक्त कमरेखाली अंतर्वस्त्रे परिधान करून हिंडत होत्या.

रविवारी, लंडनमधील वेस्टमिन्स्टर, वॉटरलू, साउथ केन्सिंग्टन, चायनाटाउन सारख्या मेट्रो स्टेशनवर शेकडो पुरुष आणि महिला दिसले ज्यांनी ट्राउझर्स किंवा पायजमा घातलेला नव्हता.

जानेवारी 2002 मध्ये न्यू यॉर्कमध्ये फक्त 7 लोकांपासून सुरू झालेली ही क्रेझ जगभरात पसरली आहे आणि यावर्षी लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमात शेकडो सहभागी झाले होते.

या क्रेझची संकल्पना मांडणारे चार्ली टॉड यांनी बीबीसीला सांगितले: "मुख्य उद्देश आनंद, खुशी आणि गोंधळाचे अनपेक्षित क्षण निर्माण करणे आहे."

ते म्हणाले, "ही परंपरा जिवंत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला आहे, कोणत्याही उद्देशाशिवाय निरुपद्रवी मनोरंजन प्रदान करणे हाच उद्देश आहे.'

(फोटो-NLakafosis71)

चार्ली टॉडने त्याच्या या डेच्या उद्देशाबद्दल सांगितले की, "नक्कीच, आपण अशा वातावरणात राहतो जिथे लोकांना सांस्कृतित युद्ध लढायला आवडतं आणि न्यू यॉर्कमध्ये माझा नेहमीच असा नियम राहिला आहे की माझे ध्येय इतर लोकांचे मनोरंजन करणे आहे, ते चिथावणी देणे किंवा कोणालाही दुखावण्यासाठी नाही, म्हणून आशा आहे की ती भावना कायम राहील."

लंडनच्या चायनाटाउन सबवे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर, डझनभर लोक बर्फाळ रस्त्यांवरून मध्य लंडनमधील पिकाडिली सर्कस भूमिगत स्टेशनवर गेले, जिथे ते त्यांच्या ट्रेनमध्ये चढले.

हे लोक गटागटाने आत शिरले. इथे फक्त एकच समस्या होती की थंड हवामानामुळे मेट्रोच्या डब्यात इतकी गर्दी होती की काही लोकांना त्यांची पॅन्ट काढायला जागा नव्हती. 

लंडनमधील लोकांनी प्लॅटफॉर्मवर पोज दिल्या, ट्रेनमध्ये प्रवास केला आणि सेल्फी काढले. मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना याची माहिती नव्हती, म्हणून जेव्हा ते मुले आणि मुलींना पायजमाशिवाय पाहत असत तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटत होतं. 

जगात ट्राउझर्सशिवाय दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. हा दिवस बर्लिन, प्राग, जेरुसलेम, वॉर्सा आणि वॉशिंग्टन डीसी येथे साजरा केला जातो. न्यू यॉर्कमध्ये हा उत्सव 2002 मध्ये झाला होता. परंतु तो लंडनमध्ये पोहोचला 2009 साली.

हे वाचलं का?

    follow whatsapp