HSC Result 2025: बारावीचा निकाल पाहण्याची तयारी करून ठेवा, इथे पाहू शकता Result

मुंबई तक

HSC Result 2025 Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात पार पडल्या.

ADVERTISEMENT

HSC Result 2025 Latest Update
HSC Result 2025 Latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारावीचा निकाल कोणत्या तारखेला होणार जाहीर?

point

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर

point

कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता बारावीचा निकाल?

HSC Result 2025 Latest Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात पार पडल्या. अशातच आता सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. 

कसा आणि कुठे पाहाल बारावीचा निकाल?  

  • mahresult.nic.in या वेबसाईटवर लॉन ऑन करा
  • बारावीच्या निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
  • तिथं असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका
  • तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
  • एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
  • निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

हे ही वाचा >> कामाची बातमी: फक्त 'या' 5 टिप्स फॉलो करा आणि काही मिनिटांतच चेक करा तुमचं PF बॅलेन्स

शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबाबत अद्यापही अधिकृत तारीख घोषित करण्यात आली नाहीय. मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांसह पालकांची निकाल पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने प्रवेश दिला जातो.

कॉलेजमध्ये इन हाऊस अॅडमिशनही सुरु असतात. त्यामुळे अॅडमिशनची प्रोसेसची तयारी करण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या महिनाभराच्या कालावधीत राज्यात बारावीच्या परीक्षा पार पडल्या. जवळपास 15 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. 

हे ही वाचा >> Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण व दमट हवामान! विदर्भातील जिल्ह्यांना झोडपणार वादळी पाऊस

हे वाचलं का?

    follow whatsapp