Ladki Bahin Yojana : 'त्या' 27 लाख अर्जदार महिलांना बसणार धक्का, 3000 रूपये जमा होणार की नाही?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana 27 lakh applicant women big blow they need to link adhhar to bank account aditi tatkare eknath shinde ajit pawar
महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास उशीर होणार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार

point

महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास उशीर होणार

point

27 लाख लाभार्थी महिलांना बसणार धक्का

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात अवघ्या काही दिवसातच 3000 रूपये जमा होणार आहेत. तत्पुर्वी महिलांच्या खात्या संदर्भात सरकारने महत्वपुर्ण आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास महिलांच्या बँक खात्यात (Bank Account) पैसे जमा होण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी सरकारने सांगितलेल्या अपडेटवर त्वरीत दुरूस्ती करून घेणे आवश्यक आहे. (ladki bahin yojana 27 lakh applicant women big blow they need to link adhhar to bank account aditi tatkare eknath shinde ajit pawar)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयारी झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी 27 लाख महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडले गेले नाही आहेत. या महिलांची बँक खाती आधार कार्डशी जोडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 

हे ही वाचा : Sanjay Raut: "महाराष्ट्रात सावत्र कुणीच नाही, दिल्लीत मोदी-शाह...", संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

महिला व  बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादात त्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी आणि  येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडून घ्यावेत असे आदेश दिले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या आणि बँक खाती आधारकार्डशी जोडलेल्या महिलांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्याचे हफ्ते जमा होणार आहेत. ज्या महिलांची बँक खाती आधारकार्डशी जोडलेली नाही आहेत. त्यांच्या खात्याशी आधारकार्ड जोडणी झाल्यानंतर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँकेशी आधारची जोडणी करून घ्यावीत. तसेच लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केली आहे. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis: "अरे वेड्यांनो...", देवेंद्र फडणवीस महायुतीतील वाचाळ नेत्यांवर संतापले

'त्या' महिलांच्या अर्जाची छाननी आजपासून

लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र ही मुदत आता अंतिम असणार नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर देखील महिलांना अर्ज करता येणार आहेत. त्याचसोबत 1 ऑगस्टनंतर भरलेल्या अर्जाच्या छाननीलाही आजपासून सूरूवात होणार आहे. त्यामुळे ऑगस्टनंतर भरलेले अर्ज आता मंजूर होण्याची शक्यता आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT