मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, कोकणात काय परिस्थिती?
हवामान अभ्यासकांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती असून, योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात कसं असेल आज हवामान?

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती
मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज, रविवार 6 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील हवामानाबाबत नवीन अंदाज जाहीर केला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, काही भागांत अवकाळी पावसाचे ढग कायम असल्याचे संकेत मिळाले आहेत.
हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणातही काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे, तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> स्कॉर्पिओमधून आले, महिलेला उचलून नेलं... पिंपरीतल्या अपहरणाचा काही तासात उलगडा, मोठा ट्वीस्ट
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेत सातत्याने वाढ होत असून, आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मुंबई परिसर, विदर्भ आणि खान्देशात उष्णतेचा जोर जाणवेल. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुलनेने तापमानात एक-दोन अंशांची शिथिलता दिसू शकते.
हवामान अभ्यासकांनी शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती असून, योग्य नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनीही उष्णतेपासून बचावासाठी पाणी आणि हलके कपडे यांचा वापर करावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.'
हे ही वाचा >> ढसाढसा रडल्या, कागद-सह्या दाखवल्या, करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंच्या कोणत्या 3 निकटवर्तीयांची नावं घेतली?
हवामानातील या बदलांमुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरणात चढ-उतार दिसून येत असून, पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षपूर्वक पाहणे गरजेचे आहे.