Maharashtra Weather : मुंबई, ठाण्यात उष्ण व दमट हवामान! 'या' जिल्ह्यात होणार वरुण राजाचं आगमन
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांमध्ये राज्यात काही जिल्ह्यांत उष्ण व दमट, काही ठिकाणी वादळी वारा तर काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात कोणत्या जिल्ह्यात पसरणार उष्णतेच्या लाटा?

कोणत्या ठिकाणी पडणार पाऊस?

आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांमध्ये राज्यात काही जिल्ह्यांत उष्ण व दमट, काही ठिकाणी वादळी वारा तर काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मुंबई शहर आणि उपनगरांत ढगाळ आकाशासह पाऊस किंवा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती.
तर काल शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आयएमडीने सांगितली होती. अशातच आज रविवारी 6 एप्रिलला संपूर्ण राज्यात कसं हवामान असेल, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसरात कोरडं हवामान असणार आहे.
हे ही वाचा >> "मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?" बँकांमधला खळखट्याक थांबणार, मनसैनिकांना काय आदेश?
तसच अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूरमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडमध्ये कोरडं हवामान असेल. लातूर, धाराशिवमध्येही पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळसाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही.