Ladki Bahin Yojana : '...तर योजनेचे 1500 हातातून गमावून बसाल', 'ही' चूक अजिबात करू नका

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana dont do these mistake otherwise you loose 1500 rs installment amount mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल

point

अर्ज फक्त 'यांनाच' स्विकारता येणार

point

ही चूक अजिबात करू नका

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत  (Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme) आता मोठा बदल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत होणारे घोटाळे पाहता सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या नवीन बदलात तुम्ही जर ती चूक केली, तर तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे. आणि 1500 रूपयाच्या निधीला गमवावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी कोणती चुक तुम्हाला टाळायची आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana dont do these mistake otherwise you loose 1500 rs installment amount mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis) 

राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती. त्यानंतर आता राज्य सरकारनं या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात रांगडा गडी येणार! अरबाज, वैभवला देणार टक्कर?

शासन निर्णय काय? 

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या प्रक्रियेसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्येही या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी आधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आलं होतं. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत. जर तुम्ही इतर पर्याय निवडला तर तुम्हाला अडचण येणार आहे आणि कदाचित तुम्हाला योजनेच्या निधीपासून मुकावे लागण्याचीही शक्यता आहे.

हे ही वाचा : Deepika Padukone: बाप्पाच पावला! रणवीर-दीपिका झाले आई-बाबा, घरी नव्या पाहुण्याचं आगमन

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते.  एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं.  संबंधित व्यक्तीनं  पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT