Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचं टेंशन मिटलं! डायरेक्ट खात्यात 4500 होणार डिपॉझिट
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात जूलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत.त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे. आता या लाभार्थी महिलांना तिसरा हफ्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली
महिलांच्या खात्यात 3000 जमा झाले आहेत
'त्या' महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात 3000 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाची (Rakshabandhan) ओवाळणी मिळाली आहे. ज्या महिलांनी 1 ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले आहेत त्यांच्यात खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात (Applicant Women) कधी पैसे जमा होणार? आणि किती पैसे मिळणार? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात जूलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत.त्यामुळे या महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिलासा मिळाला आहे. आता या लाभार्थी महिलांना तिसरा हफ्ता हा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे. याची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Video : दुचाकीवरून आले, आईसमोरच मुलावर तलवारीने सपासप वार..., कोल्हापुरात काय घडलं?
या योजनेत अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव, दाखले आणि इतर पुरावे जमा करण्यासाठी खूप उशीर झाला होता. त्यामुळे अनेक महिलांना अर्ज करण्यासाठी ऑगस्ट उजाडला होता. त्यामुळे आधीच अर्ज करण्यास उशीर झाल्याने महिलांना लाभ देखील उशीराने मिळणार आहेत.
हे वाचलं का?
ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत. त्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्यास सरकारने आता सूरूवात केली आहे. त्यामुळे आता या महिलांच्या अर्जावर सरकारकडून उत्तर येणार आहेत. जसे महिलांचे अर्ज अप्रुव्ह ठरले आहेत की नाही. तसेच अर्जामध्ये दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. किंवा तुमचे अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या अर्जावर अशाप्रकारे उत्तर आल्यानंतर तुमच्या खात्यात पुढची प्रोसेस होणार आहे.
4500 कसे जमा होणार?
खरं तर ज्यांचे अर्ज अद्याप मंजूर झाले नाहीत त्यांना जुलै,ऑगस्टचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर सप्टेंबरआधी जर महिलांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशी तीन महिन्यांचे एकत्रित 4500 खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना तीनही महिन्यांचा हप्ता एकाच महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mumbai Local Video : टीसीचा शर्ट फाडला, बुक्के मारले... मुंबई लोकलमध्ये तुफान राडा!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT