Ladki Bahin Yojana : निवडणुकीच्या गोंधळात महिलांना पुढचा हप्ता कधी मिळणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme when will women get 1500 rupees maharashtra assembly election 2024 aditi tatkare mukhymantri ladki bahin yojana scheme
महिलांना पुढचा हप्ता कधी मिळणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींच्या खात्यात 7500 जमा

point

पुढचा हप्ता कधी मिळणार?

point

किती तारखेला खात्यात पैसे येणार?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. सरकारने निवडणुका असल्या कारणाने एका महिन्याचा निधी महिलांना आधीच दिला होता. त्यामुळे आता महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. अशात राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या गोंधळात महिलांना पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme when will women get 1500 rupees maharashtra assembly election 2024 aditi tatkare mukhymantri ladki bahin yojana scheme) 

'या' महिलांच्या खात्यात 7500 जमा

खरं तर जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानंतर महिलांनी अर्ज करण्यास सूरूवात केली होती. यावेळी ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज केले होते. त्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाआधी 3000 रूपये जमा झाले होते. त्यानंतर सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवली होती. या दरम्यान अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले होते.त्यानंतर सरकारने पुन्हा अर्ज करण्यास सप्टेंबरपर्यत मुदतवाढ दिली होती. या मुदतीनंतर सरकारने पुन्हा 15 ऑक्टोबपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीत अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 1500 रूपये जमा झाले होते. सरकारने नोव्हेंबरचा हप्ता एक महिनाआधीच महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे महिलांच्या खात्यात आतापर्यंत सरकारने 7500 रूपये जमा केले आहेत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत 'या' महिलांसाठी मोठी अपडेट!

पुढचा हप्ता कधी मिळणार? 

विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल,असा दावा विरोधकांकडून सतत केला जात आहे. या दाव्यानंतर  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच महिलांच्या खात्यात नोव्हेबरपर्यंत म्हणजेच पाच महिन्याचे 7500 रूपये खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता महिलांना डिसेंबरमध्ये खात्यात येणाऱ्या 1500 रूपयांची उत्सुकता लागली आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे . त्याचसोबत या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

योजनेच्या निधीला ब्रेक मिळणार आहे का? 

लाडकी बहीण योजनेच्या निधीला ब्रेक लागणार असल्याच्या वृत्तानंतर इंडिया टुडेने महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी बातचित केली होती.यामध्ये किरण कुलकर्णी यांनी ही लाडकी बहीण योजना कायम (सूरू राहील) राहणार आहे, अशी माहिती दिली. पण मॉडेल कोड ऑफ कडंक्टनुसार (MCC) कोणत्यागही नवीन लाभार्थी या योजनेत जोडला जाऊ शकत नाही. आणि जर महिला बालविकास विभागाला महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर करायचे असतील तर त्यांना निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : ladki Bahin Yojana: सरकारच्या घोषणेनंतरही खरंच मिळणार नाहीत 3000? महिलांनो दिवाळी बोनसचं सत्य एकदा जाणून घ्या

मॉडेल कोड ऑफ कडंक्टच्या (MCC)सामान्य सूचनांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की,  MCC कालावधी दरम्यान कोणतीही नवीन योजना किंवा विद्यमान योजनांसाठी नवीन लाभार्थी जोडण्याची परवानगी नाही. निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय निधी वितरित केला जाऊ शकत नाही. राज्य सरकार एमसीसीच्या सूचनांचे पालन करत आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT