Ladki Bahin Yojana : 'या' महिलांना 'लाडकी बहीण' योजनेचा एकही रूपया मिळाला नाही, कारण...

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana news women received 7500 amount mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare
आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांनी लाभ घेतला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींच्या खात्यात 7500 जमा

point

या महिलांना एकही रूपया मिळाला नाही

point

या महिलांना धक्का बसला आहे

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांनी लाभ घेतला आहे. या महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा झाले आहेत. अशाप्रकारे महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंत 7500 रूपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. अशात काही महिला अशा देखील आहेत, ज्यांना खात्यात योजनेचा एकही रूपया आला नाही आहे. त्यामुळे या महिलांना धक्का बसला आहे. (ladki bahin yojana news women received 7500 amount mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare)  

खरं तर जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानंतर महिलांनी अर्ज करण्यास सूरूवात केली होती. यावेळी ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज केले होते. त्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाआधी 3000 रूपये जमा झाले होते. त्यानंतर सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत ठेवली होती. या दरम्यान अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले होते.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, नोव्हेंबरपर्यंतचे 7500 आले,आता डिसेंबरचे 1500 कधी मिळणार?

त्यानंतर सरकारने पुन्हा अर्ज करण्यास सप्टेंबरपर्यत मुदतवाढ दिली होती. या मुदतीनंतर सरकारने पुन्हा 15 ऑक्टोबपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीत अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 1500 रूपये जमा झाले होते. सरकारने नोव्हेंबरचा हप्ता एक महिनाआधीच महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे महिलांच्या खात्यात आतापर्यंत सरकारने 7500 रूपये जमा केले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता एकीकडे काही महिलांच्या खात्यात 7500 रूपये जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नाही आहे. यामागची कारणे सांगायची झाली तर सरकारने दिलेल्या अटीत या महिला पात्र ठरू शकल्या नाहीत. अनेक महिलांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त होते. तसेच काही महिलांच्या घरातील व्यक्ती हे सरकारी कर्मचारी होते. तसेच काही महिलांकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड नव्हते. काही महिला कागदपत्राची जुळवाजुळव आणि नमुद केलेल्या वेळेत अर्ज भरू शकल्या नाही. या सगळ्या कारणाने या महिलांना एकही रूपया मिळू शकला नाही आहे. 

हे ही वाचा : ladki Bahin Yojana: सरकारच्या घोषणेनंतरही खरंच मिळणार नाहीत 3000? महिलांनो दिवाळी बोनसचं सत्य एकदा जाणून घ्या

    follow whatsapp

    ADVERTISEMENT