ladki Bahin Yojana: सरकारच्या घोषणेनंतरही खरंच मिळणार नाहीत 3000? महिलांनो दिवाळी बोनसचं सत्य एकदा जाणून घ्या
Mazi Ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ऑक्टोबर महिन्यात 3000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दिवाळी बोनसबाबत लेटेस्ट अपडेट काय?
लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार की नाही? वाचा सविस्तर माहिती
सरकारने दिली सर्वात महत्त्वाची माहिती
Mazi Ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: राज्य सरकारने विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा करण्याआधी महिलांना मोठं आवाहन केलं होतं. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ऑक्टोबर महिन्यात 3000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे या योजनेच्या पात्र महिलांना दिवाळी बोनसच्या रक्कमेची प्रतिक्षाच लागली होती. महिलांना राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. परंतु, या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या दिवाळी बोनसचं काय? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे.
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती
निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर राज्यात कोणत्याही आर्थिक योजनेच्या माध्यमातून पैसै न देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्यातील महिला व बालविकास मंत्रालयाने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी रक्कम थांबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 2.4 कोटी महिलांना पाच हफ्त्यांची रक्कम दिल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीदरम्यान महिलांना यापुढील रक्कम दिली जाणार नाही. तसच या योजनेसाठी नवीन अर्जही करता येणार नाहीत. विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सरकारने महिलांच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची रक्कम आधीच जमा केली आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Election: "चहावाले नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस मतांची भीख..."; अर्ज दाखल करताच अभिजीत बिचुकले कडाडले| Shiv Sena (Shinde) Candidates List|
बोनस मिळणार की नाही?
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3000 रुपयांचा बोनस देण्याची घोषणा केली होती, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. परंतु, निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर बोनसचे पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना दिवाळीला बोनस मिळणार नाही, हे स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिवाळीला बोनस मिळणार असल्याच्या व्हायरल बातम्या खोट्या असल्याचं तटकरेंनी सांगितलं.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Prithvi Shaw चा खेळ खल्लास! मुंबईच्या स्टार फलंदाजाला रणजी ट्रॉफीतून का वगळलं? धक्कादायक कारण आलं समोर
जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेची सूरूवात करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा करण्यात आले होते. त्यानुसार आता नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात 7500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींनी या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT