Shikshak Bharati : शिक्षकांची लॉटरीच लागली, 'या' जिल्ह्यात बंपर भरती; पगार किती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 nagpur municiple corporation recruitement 2024 shikshak bharti how to apply know full details
नागपूर महापालिकेद्वारे ४४ जागांसाठी होणार शिक्षक भरती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर महापालिकेत 44 रिक्त पदांसाठी भरती

point

वय आणि मुलाखतीचे स्वरूप कसे असणार आहे?

point

किती पगार मिळणार?

NMC Shikshak Bharati 2024 : शिक्षकाची नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर महापालिकेतर्फे शिक्षकांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत तब्बल 44 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास इच्छुक असाल तर पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय आणि मुलाखतीचे स्वरूप कसे असणार आहे? हे जाणून घेऊयात. (nagpur municiple corporation recruitement 2024 shikshak bharti how to apply know full details)

नागपूर महापालिकेने 44 रिक्त पदांसाठी ही भरती काढली आहे. या 44 पैकी क्रीडा शिक्षक म्हणून 13 जागा भरल्या जाणार आहेत आणि संगीत शिक्षक म्हणून देखील तितक्याच म्हणजे 13 जागा भरल्या जाणार आहेत. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी 18 जागा असणार आहे. त्यामुळे अशाप्रकारे या 44 जागा भरल्या जाणार आहेत.

हे ही वाचा : Western Railway मध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 'इतका' पगार

शैक्षणिक पात्रता काय? 

क्रीडा शिक्षक : बी.पी.एज(बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) आणि एम.पी.एड (मास्टर्स ऑफिसफिजिकल एज्युकेशन)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संगीत शिक्षक : बी . ए. (बॅचरलर ऑफ आर्ट्स) , एम.ए.(मास्टर्स ऑफ आर्ट्स)

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक : बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) आणि मास्टर ऑफ सायन्स (एमएससी), बी . ए. (बॅचरल ऑफ एज्युकेशन), एम.ए.(मास्टर्स ऑफ एज्युकेशन)

ADVERTISEMENT

अर्जदारांनी हे फॉर्म भरावेत

दरम्यान अर्जदार शिक्षकांना http://www.nmcnagpur.gov.in या साईटवर जाऊन या भरतीसाठी इतर माहिती मिळवता येणार आहे. त्याचसोबत जे क्रीडा आणि संगीत शिक्षक आहेत त्यांना https://nmcnagpur.gov.in/assets/300/2024/09/mediafiles/3.pdf हा फॉर्म डाऊनलोड करायचा आहे. आणि मुलाखतीला येतेवेळेस भरून घेऊन यायचा आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक  यांना अर्ज करताना https://nmcnagpur.gov.in/assets/300/2024/09/mediafiles/1.pdf हा फॉर्म भरायचा आहे. हा आणि मुलाखतीच्या वेळेस घेऊन यायचा आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Govt Job: मुंबई महानगरपालिकेत 'या' एका पदावर सरकारी नोकरीची मोठी संधी! शैक्षणिक पात्रता काय?  

मुलाखत कुठे होणार? 

क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक या पदांसाठी मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 तसेच इतर पदांसाठी 26 व 27 सप्टेंबर 2024 आहे. या पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे अर्जदारांना शिक्षक विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर या पत्यावर वेळेत पोहोचायचे आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT