Ladki Bahin Yojana : तारीखही ठरली आणि पैसे देखील, 4500 की 1500...तुमच्या खात्यात किती येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

aditi tatkare declare third installement date mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar
तिसरा हप्ता आता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

29 सप्टेंबरला तिसरा हप्ता येणार

point

महिलांना 1500 रूपये मिळणार

point

4500 कुणाच्या खात्यात येणार?

Aditi Tatkare Third Installment Date : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. रायगडमध्ये लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार आहेत. मात्र काही महिलांना 1500 रूपये तर काहींना 4500 रूपये पाठवण्यात येणार आहे. यापैकी तुमच्या खात्यात किती पैसे येणार आहेत? हे जाणून घेऊयात. (aditi tatkare declare third installement date mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde ajit pawar)

ADVERTISEMENT

आदिती तटकरे या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : योजनेचे 4500 कुणाला मिळणार? 'या' यादीत तुमचं नाव तपासा

लाडकी बहीण योजजनेचा पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात 17 ऑगस्टला पार पडला होता. यावेळी पहिला हप्त्यात आपण 1 कोटी 7 लक्ष महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत केला होता. त्यानंतर लाडकी बहीणचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी देखील महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत केला होता. आता येत्या 29 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता 29 ऑगस्टला जमा होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुणाला 4500 रूपये मिळणार?

आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका कुणाला लाभ मिळणार आहे? याची देखील माहिती दिली आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटीनिमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत. आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : बँक खात्यात 4500 जमाच झाले नाही! महिलांनो, कुठे कराल तक्रार?

या महिलांच्या खात्यात 1500 येणार

दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. त्याच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेले नाही आहे, त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात  जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT