Ram Mandir : कपाळी टिळा, रत्नजडित दागिने… रामलल्लाच्या अलौकिक श्रृंगाराचे वैशिष्ट्य काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ram Lalla Idol : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. यानंतर भक्तांना पहिल्यांदाच रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन झालं. दाक्षिणात्य पद्धतीने सजावट केलेली रामलल्लाची ही मूर्ती फारच सुंदर दिसत आहे. पंतप्रधान मोदींनीही रामलल्लाची मनोभावे पूजा केली. (Ram Mandir Inaugration Ramlalla’s tilak jeweled gemstone ornaments What is the features and Importance About it )

ADVERTISEMENT

आकर्षक दागिने, फुलांची आरास यामुळे रामलल्लाचं मनमोहक रुप पाहता क्षणी लध वेधून घेत होतं. रामलल्लाची 51 इंचाची मूर्ती विराजमान केल्यानंतर त्याच्या श्रृंगाराचे वर्णन केले जात आहे. रामलल्लाच्या बालरूपाची पूर्ण विधींसह प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर श्री राम मंदिर ट्रस्टने 16 दागिन्यांचे वर्णन केले आहे. रामलल्लाचे हे अलौकिक रूप पाहून भक्तांना आनंद आणि विस्मय होत आहे.

वाचा : PM मोदींचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; म्हणाले, “त्यांच्या नेतृत्वामुळे…”

रामलल्लाच्या मूर्तीत काय आहे खास?

राम मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची काही खास वैशिष्ट्य आहेत. लोकांचे लक्ष विशेषतः रामलल्लाच्या टिळ्याने वेधले गेले जे खूप सुंदर आणि वेगळे दिसते. हा टिळा खास डायमंड आणि माणिक रत्नांपासून बनवण्यात आला आहे. जो खूप आकर्षक दिसतो. जर रामलल्लाच्या धनुष्यबाणाबद्दल बोलायचं झालं तर, ते सोन्याचे बनलेले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रामलल्‍ला मूर्तीच्या चौबाजूंनी आभाळमंडळ आहे. मूर्तीवर स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्यदेव आहेत. मोठे डोळे आणि भव्य कपाळ खूप आकर्षक आहे. तसंच भगवान विष्णूचे १० अवतारही मूर्तीत कोरण्यात आले आहेत. मूर्तीच्या खाली एका बाजूला रामाचे निस्सीम भक्त हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड देखील कोरलेले आहेत.

वाचा : Crime Patrol चे 1300 भाग पाहिले, तुकड्यांमध्ये जाळलं; दोन वर्षानंतर कशी उलघडली Murder मिस्ट्री?

रामलल्लाच्या दागिन्यांची वैशिष्ट्य कोणती?

  • रामलल्ला म्हणजेच प्रभू रामाचे हे बालरूप आहे. त्यामुळे मूर्तीसमोर पारंपरिक पद्धतीने चांदीचा खुळखुळा, हत्ती, घोडा, उंट, खेळण्यांची गाडी ठेवण्यात आली आहे.
  • रामलल्लाचे मुकुट – उत्तर भारतीय परंपरेचा सोन्याचा मुकुट, त्यात माणिक, पाचू आणि हिरे जडलेले आहेत.
  • कुंडल – कानात मोराची डिझाइन असलेले कुंडल आहेत.
  • कंठा- अर्धचंद्राकार रत्नजडित सोन्याच्या हार आहे. ज्याच्या मध्यभागी सूर्य आहे. हे हिरे, माणिकने जडलेले आहे. खाली पाचूच्या लडी आहेत.
  • कौस्तुभमणी – हा दिव्य अलंकार प्रभू श्री रामाच्या हृदयात बसवला आहे. हा दुर्मिळ दागिना मोठ्या माणिक आणि हिऱ्यांनी बनवला आहे. भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार त्यांच्या हृदयात कौस्तुभमणी धारण करतात असे शास्त्र आहे.

वाचा : Manoj Jarange : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सुरू असताना जरांगे पाटील काय करत होते?

  • पदिक – मानेच्या खाली आणि नाभीच्या वर घातलेल्या दागिन्यांना पदिक म्हणतात. विद्वानांच्या मते देवतांच्या अलंकारात याला विशेष महत्त्व आहे. हिरे आणि पन्ना जडलेले पदिक रामलल्लाने परिधान केले आहे, त्याच्या खाली एक मोठे पेंडेंट आहे.
  • वैजयंती विजयमाला : रामलल्लाचा तिसरा सर्वात लांब सोन्याचा हार. हे विजयाचे प्रतीक म्हणून परिधान केले जाते.
  • करधनी – करधनी म्हणजे कंबरपट्टा यामध्ये नैसर्गिक सुषमाच्या खुणा आहेत. हिरे, माणिक, मोती आणि पाचूने बनलेले हे दागिने शुद्धतेची भावना देतात. त्यात पाच लहान घंटाही बसवण्यात आल्या आहेत.
  • भुजबंध – दोन्ही हातांना सोने आणि रत्नांनी जडलेला भुजबंध म्हणजेच बाजूबंध घातला आहे.
  • कंकण – रत्नांनी जडलेले सुंदर कंकण दोन्ही हातांना घातले आहेत.
  • मुद्रिका – डाव्या-उजव्या हाताच्या मुद्रिकांत रत्नजडित मुद्रिका सुशोभित आहेत, त्याला मोतींची डिझाइनही आहे.
  • पैंजण – पायात छडा, सोन्याचे पैंजण घातले आहे.
  • सुवर्ण धनुष्य – रामललाच्या डाव्या हातात सोन्याचे धनुष्य आहे. याला मोती, माणिक आणि पाचूंची डिझाइन आहे.
  • वनमाळा – रामलल्लाच्या या अलौकिक रूपाला रंगीबेरंगी फुलांच्या वनमाळांनी सजवण्यात आले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT