Election 2024 : कोणत्या ग्रहामुळं निवडणुकीत मिळतं यश? कसं आहे शनी ग्रहाचं कनेक्शन? वाचा सविस्तर
Election 2024 Astrology : राजकारण यशस्वी होण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. पण यासाठी त्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचं शुभ कार्य असणं खूप आवश्यक असतं. ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने 9 ग्रहांचा समावेश केला करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोणत्या ग्रहामुळे निवडणुकीत विजय प्राप्त होतो?
'या' शुभ ग्रहांमुळे राजकारणात मिळतं यश
ग्रहांच्या स्थितीबाबत जाणून घ्या माहिती
Election 2024 Astrology : राजकारण यशस्वी होण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. पण यासाठी त्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचं शुभ कार्य असणं खूप आवश्यक असतं. ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने 9 ग्रहांचा समावेश केला करण्यात आला आहे. सर्व ग्रह कोणत्या ना कोणत्या क्षेत्रासाठी अनुकूल मानले जातात. काही ग्रहांचा संबंध सत्ता-सुख, प्रसिद्धी आणि सामाजिक क्षेत्रासाठी जोडला जातो. असे लोक राजकारणात सक्रीय होतात.
ADVERTISEMENT
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबरला पार पडलं असून आज या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशातच निवडणुकीत कोणती आघाडी बाजी मारणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नेत्यांसह मतदारांना या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
निवडणुकीत कोणकोणत्या पक्षाला विजय मिळेल, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु, ज्योतिषशास्त्रातही सत्ता, शासन, राजकारण आणि निवडणूक आदी गोष्टींबाबत सविस्तरपणे सांगण्यात आलंय. सूर्य, गुरु आणि शनी असे ग्रह आहेत, जे या क्षेत्रांना प्रभावीत करतात. या ग्रहांची स्थिती मजबूत असल्यावर निवडणुकीत विजय होतो. निवडणुकीला प्रभावित करणाऱ्या या ग्रहांबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हे वाचलं का?
सूर्य ग्रह
ज्योतिष शास्त्रात सर्व 9 ग्रहांमध्ये सूर्य ग्रहाचं विशेष स्थान आहे. सूर्याला ग्रहांचा राजा असंही म्हणतात. हा ग्रह आत्मविश्वास, शक्ती, यश, प्रसिद्धी, सन्मानाचं प्रतिनिधित्व करतं. राजकारण, प्रशासन, उच्च पद आदी गोष्टींचं कारकही सूर्याला मानलं जातं. निवडणुकीत यश मिळावं असं तुम्हाला वाटत असेल, तर सूर्य देवाची पूजा करा.
हे ही वाचा >> Optical Illusion Test: फोटोत लपलाय हत्ती! पण शोधणं खूपच कठीण, दिमाग लावा अन् 5 सेकंदात शोधा पाहू
गुरु ग्रह
गुरु ग्रहाचं स्थानही राजकारणात महत्त्वाचं मानलं जातं. कारण या ग्रहाचा संबंध ज्ञान, उच्च पद आणि प्रशासनाशी जोडलेला असतो. कुंडलीत गुरु शुभ असेल, तर राजकारणात यश मिळतं आणि उच्च पदाची जबाबदारी मिळते.
ADVERTISEMENT
शनी ग्रह
राजकारण किंवा निवडणुकीसाठी शनी ग्रहाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. शनी देव न्यायप्रीय देवता आहे, हे यामागचं कारण आहे. हा ग्रह कर्मानुसार फलश्रुती देतो. विशेषत: निवडणुकीत शनीची भूमिका खूप महत्त्वाची असते. ज्यांच्या कुंडलीत शनी शुभ असतो, त्यांना जनतेची साथ मिळते.
ADVERTISEMENT
टीप - सूत्रांच्या आधारावर राजकारण आणि निवडणुकीच्या भविष्याबाबत माहिती देण्यात आलीय. या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT