Kitchen Cleaning Tips: महिलांनाे! फक्त 2 रुपयांच्या लिंबूने संपूर्ण किचन होईल स्वच्छ, 'असा' करा वापर
How To Clean Kitchen By Using Lemon : रोजच्या आहारात अनेक जण लिंबूचा वापर करतात. पण हा छोटासा लिंबू फक्त जेवणालाच चविष्ट करत नाही, तर किचनमध्ये साफसफाईच्या कामंही झटपट करून देतो.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लिंबूचा वापर करून किचन साफ करा, प्रसिद्ध शेफने दिल्या टीप्स
किचनमध्ये लागलेले डाग झटपट स्वच्छ होतील, लिंबूचा वापर कसा कराल?
संपूर्ण किचन साफ करण्याच्या महत्त्वाच्या टीप्स जाणून घ्या
How To Clean Kitchen By Using Lemon : रोजच्या आहारात अनेक जण लिंबूचा वापर करतात. पण हा छोटासा लिंबू फक्त जेवणालाच चविष्ट करत नाही, तर किचनमध्ये साफसफाईच्या कामंही झटपट करून देतो. लिंबूचा वापर करून किचनमध्ये कशाप्रकारे साफसफाई करू शकता, याबाबत शेफ पंकजने महत्त्वाच्या टीप्स शेअर केल्या आहेत. नवरात्रीचा उस्तव सुरु होत आहे. त्याआधी तुम्हाला घराची साफसफाई करण्याचे टीप्स खूप कामी येतील. जाणून घेऊयात लिंबूमुळे होणारे साफसफाईचे फायदे.
ADVERTISEMENT
किचन स्लॅब आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंना करा साफ
किचन स्लॅब आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंना नेहमीच तेल-मसाल्याचे डाग लागतात. काही ठिकाणी काळपट डाग लागतात आणि हे डाग लवकर साफ होत नाहीत. शेफ पंजक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक गोष्टींसाठी लिंबू खूप फायदेशीर होऊ शकतो. सर्वात आधी एक लिंबू घ्या आणि त्याचे दोन तुकडे करा. आता लिंबूच्या एका तुकड्यावर बेकिंग सोडा टाका. त्यानंतर लिंबू किचनच्या स्लॅब आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर घासा. जेणेकरून यावर लागलेले डाग झटपट साफ होतील.
मायक्रोवेव्हला साफ करा
मायक्रोवेव्हचा खूप जास्त वापर केल्यावर ते खराब होऊ शकतं. या उपकरणालाही डाग लागू शकतात. परंतु, शेफ पंकज यांनी सांगितलेल्या टीप्समुळे मायक्रोवेव्ह खूप सोप्या पद्धतीनं साफ केला जाऊ शकतो. सर्वात पहिले अर्धा वाटी पाणी घ्या. यामध्ये लिंबूचे तीन-चार तुकडे टाका. लिंबूच्या तुकड्यांना मायक्रोवेव्ह मध्ये ठेऊन 2 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हला ऑन करा. 2 मिनिटांनंतर मायक्रोवेव्हला कपड्याने साफ करा. त्यानंतर सर्व डाग निघून जातील आणि मायक्रोवेव्ह चकाचक होईल.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Couple Viral Video: नवरीच्या बोटात अंगठी जात नव्हती! पंडितने केलं असं काही...नवरा कोमात, पाहुणे जोमात
डस्टबिनला करा दुर्गंधीमुक्त
डस्टबिनमध्ये अनेकदा पॉलिथीन टाकल्यानंतर खालच्या भागात ओलसरपणा निर्माण होतो. पण या सर्व समस्यांवर एक भन्नाट उपाय शेफ पंकज यांनी सांगितला आहे. यासाठी सर्वात आधी एका टीशू पेपरमध्ये थोडासा बेकिंग सोडा घ्या. आता यामध्ये लिंबू पिळून टाका. त्यानंतर या टीशू पेपरला डस्टबिनच्या खाली चिकटवून ठेवा. यामुळे डस्टबिनमधील ओलावा सुकण्यास मदत मिळते. यामुळे डस्टबिन क्लीन आणि स्मेल फ्री होतं.
गॅस स्टोव्हला साफ करा
गॅस स्टोव्हला साफ करण्यासाठीही लिंबूचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका मोठ्या वाटीत गरम पाणी घ्या. आता यात एक चमचा बेकिंग सोडा आणि तीन चार स्लाईस लिंबू टाका. त्यानंतर गॅस स्टोव्हला काही मिनिटांसाठी तसच ठेवा आणि ब्रशने साफ करा. त्यानंतर गॅस स्टोव्हला चकाकी येईल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Cooker Safety Tips : जेवण शिजवताना 'या' गोष्टी लक्षातच ठेवा! किचनमध्ये प्रेशर कुकरचा स्फोट कधीच होणार नाही
फ्रिजला बनवा स्मेल फ्री
शेफ पंकजने दिलेल्या टीप्सनुसार, फ्रिजमध्ये असलेल्या दुर्गंधीला दूर करण्यासाठीही लिंबूचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका छोट्या वाटीत लिंबूचे 3-4 स्लाईस घ्या. आता यामध्ये थोडा बेकिंग सोडा टाका आणि या वाटीला फ्रिजमध्ये ठेवा. असं केल्याने फ्रिज साफ होईल आणि फ्रिजला दुर्गंधी येणार नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT