International Womens Day: जागतिक महिला दिन 8 मार्चला का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास?
International Women’s Day Histor and Significance: समाजिक जीवनात पुरुषांप्रमाणेच महिलाही मोलाचं योगदान देतात. परंतु, अनेक ठिकाणी पुरुषांसारखे समान अधिकार महिलांना दिले जात नाहीत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

1911 मध्ये अनेक देशांनी साजरा केला महिला दिन

कधी आणि केव्हा निश्चित झाली 8 मार्चची तारीख?

जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घ्या सविस्तर माहिती
International Women’s Day History and Significance: समाजिक जीवनात पुरुषांप्रमाणेच महिलाही मोलाचं योगदान देतात. परंतु, अनेक ठिकाणी पुरुषांसारखे समान अधिकार महिलांना दिले जात नाहीत. समजासाठी महिलांनी दिलेल्या योगदानाचं महत्त्व समजण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. पण हा दिवस साजरा करण्यासाठी 8 मार्चचाच दिवस का निवडला गेला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
वास्तविक आंतरराष्ट्रीय महिला दिवस एका आंदोलनाची उपज आहे. याची सुरवात वर्ष 1908 मध्ये झाली होती. जेव्हा अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात जवळपास 15 हजार महिला त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. नोकरीचे तास कमी करण्याची मागणी या महिलांनी केली होती. कामानुसार वेतन देणं आणि त्याचसोबत मतदानाचा अधिकार देणं..महिलांनी केलेल्या या आंदोलनाच्या एक वर्षानंतर अमेरिकेच्या स्पेशलिस्ट पार्टीने राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्याची घोषणा केली आणि 1909 मध्ये अमेरिकेत पहिला राष्ट्रीय महिला दिवस (National Womens Day) साजरा करण्यात आला. त्यावेळी फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी महिला दिन साजरा करण्यात आला.
हे ही वाचा >> Pune Police : पुण्यात 'खाकी'लाही भाईगिरीचा नाद? पोलिसाचं गुन्हेगारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन
1911 मध्ये अनेक देशांनी साजरा केला महिला दिन
वर्ष 1910 मध्ये महिला दिनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा प्रस्ताव जर्मनीची एक महिला क्लारा जेटकिन यांनी ठेवला होता. क्लारा त्यावेळी युरोपीय देश डेनमार्कची राजधानी कोपेनहेगनमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपली भूमिका मांडत होती. तिथे असलेल्या सर्व महिलांनी त्यांचं समर्थन केलं आणि त्यानंतर 1991 मध्ये ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये पहिल्यांदा महिला दिवस साजरा केला गेला.
कधी आणि केव्हा निश्चित झाली 8 मार्चची तारीख?
वर्ष 1917 च्या क्रांतीदरम्यान महिलांनी रशियामध्ये 8 मार्चला मोठं आंदोलन केलं होतं. यामुळे तेथील प्रशासनावर दबाव आला आणि महिलांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आला. या ऐतिहासिक आंदोलनाने संपूर्ण जगात छाप टाकली. त्यानंतर 1975 मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्रने महिला दिनाला अधिकृतरित्या मान्यता दिली. हा दिवस साजरा करण्यासाठी 8 मार्चची तारीख निश्चित करण्यात आली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्चला साजरा केला जातो.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh: तुमच्या पायखालची जमीन हादरून जाईल, संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट आला समोर!
प्रत्येक वर्षी निश्चित केली जाते थीम
दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम निश्चित केली जाते. 'Accelerate Action' ही थीम यंदा 2025 या वर्षासाठी देण्यात आलीय. याचा अर्थ असा आहे की, फक्त बोलण्यातून नाही, तर प्रत्यक्षात ठोस पावलं उचलून महिलांना त्यांचे हक्क आणि सशक्तीकरणासाठी दिशा देण्याची वेळ आली आहे.