Ajit Pawar Baramati : लोकसभेला एकटा होतो, पण आता माझी आई, बहिणींची साथ... अजितदादा कडाडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांचं तुफान भाषण

point

आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढा वाचला

point

शरद पवार यांच्यावर बोलणं टाळलं?

Ajit Pawar Baramati : अजित पवार यांची बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेसाठी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवारही उपस्थित होत्या. बारामती विधानसभेच्या निवडणुकीवर यंदा संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीनंतर आता विधानसभेला पुन्हा युगेंद्र पवार आणि अजित पवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार आठव्यांदा मैदानात आहेत. मात्र यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी अटीतटीची असणार आहे. मागच्यावेळी तुम्ही मला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं, सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी या सभेत आपण केलेल्या कामांचा पाढा वाचला. मात्र शरद पवार यांच्यावर थेट टीका करणं अजित पवार यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं.

ADVERTISEMENT


हे ही वाचा >> Assembly Elections : अखेरच्या क्षणी समोर आला धक्कादायक सर्व्हे, सत्ताबदल की फोडाफोडी? वाचा आकडे

"टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं आवडलं नाही"
 

काल जे टेक्सटाईल पार्कमध्ये जे घडलं ते मला आवडलं नाही. काकी माझ्या आईसारख्या आहेत. एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नका ना, त्यातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मागच्या वेळी मी एकटा पडल्यासारखं झालं होतं, पण यंदा माझ्यासोबत माझी आई, बहिणी, पत्नी, माझ्या सोबत आहेत असं म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. या निवडणुकीत कुणीही भावनिक होऊ नका, आपल्याला काम करायचंय. बारामतीत गुंडगिरी, दहशत चालू देणार नाही, गुन्हा केला की, त्याला टायरमध्ये टाकायचं, नाहीतर तडीपार करायचं असं म्हणत अजित पवार यांनी इशाराही दिला.

मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजनासारख्या योजना आम्ही आणल्या पण विरोधकांनी यावरुन आमच्यावर भरपूर टीका केली असं अजित पवार म्हणाले. बारामतीमध्ये केलेल्या कामांबद्दल बोलताना पाच वर्षांच्या कारकीर्दीत आम्ही बारामतीचा बस डेपो केला, बाबूजी नाईक वाडा अंतिम टप्प्यात, शिवसृष्टींचंही काम अंतिम टप्प्यात आहे असं अजित पवार म्हणाले. बारामतीकरांनो माझ्यावर आता फक्त बारामतीची जबाबदारी नाही, माझ्यावर पक्षाची, माझ्या उमेदवारांचीही जबाबदारी आहे, पण तरी दिवाळीत  मी गावात धावता दौरा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 50 गावं कव्हर केलं असं अजित पवार म्हणाले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार यांनी वेगवेगळ्या जाती-धर्मांची नावं घेत बहुजन समाजाच्या संपूर्ण मुलामुलींसाठी मी नोकरीच्या संधी निर्माण करुन देईन असं अजित पवार म्हणाले. 


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT