Maharashtra Vidhansabha Election 2024: 'रोहित पवारांना मुख्यमंत्री करणार?', शरद पवारांचं मोठं विधान!
Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभा निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सभांचा धडाका लावत विरोधकांना धारेवर धरलं आहे
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य
रोहित पवारांबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
कर्जत जामखेडच्या सभेत पवारांनी फुंकली तुतारी
Maharashtra Vidhansabha Election 2024: 'रोहित पवारांना मुख्यमंत्री करणार?', शरद पवारांचं मोठं विधान!
विधानसभा निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सभांचा धडाका लावत विरोधकांना धारेवर धरलं आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना रंगणार असतानाच आता पवारांनी कर्जत जमाखेडच्या सभेत मोठं विधान केलं आहे. रोहित पवारांना मुख्यमंत्री करणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी या सभेच्या माध्यमातून दिले. पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
"तुम्हा सगळ्यांसाठी जे-जे करायचं असेल ते करण्यासाठी हा प्रतिनिधी अजिबात मागे राहणार नाही. ही खात्री या ठिकाणी देतोय. आणखी एक गोष्ट सांगतो. रोहितचं वय लहान हे आहे तुम्हाला ठावूक आहे. त्याच्या आमदारकीची पहिली टर्म आहे. आता दुसऱ्या टर्मसाठी तुमची मतं मागतोय. 1967 साली मी पहिल्यांदा आमदार झालो. माझं वय 27 होतं. पहिली 5 वर्ष मी आमदार होतो. मला काही पद नव्हतं. आता या पहिल्या पाच वर्षात रोहितलाही पद नव्हतं. आमदारच होता, असं शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "मला गद्दाराला गाडायचंय, कोणत्याही परिस्थितीत...", कर्जतच्या सभेत उद्धव ठाकरे कडाडले
पवार पुढे म्हणाले, "मला स्वत:ला पहिले 5 वर्ष फक्त आमदार, दुसऱ्या वर्षी राज्यमंत्री, तिसऱ्या वर्षी मंत्री, चौथ्या वर्षी मुख्यमंत्री नंतर देशाचा संरक्षणमंत्री.. ही सगळी पदं मला पहिल्या वर्षी मिळाली नाहीत. दुसऱ्या वर्षापासून ही पदं मिळाली.आता यांचं पहिलं वर्ष संपलं.. आता दुसरं वर्ष तुमच्या हातात आहे. तर दुसऱ्या वर्षात काय करायचं हे माझ्या हातात आहे".
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Election: मुंबईच्या मतदारांसाठी गुड न्यूज! मध्य रेल्वे चालवणार स्पेशल ट्रेन, 'असं' आहे शेड्युल
कर्जत-जामखेड या भागात गेल्या पाच वर्षांपासून रोहितला तुम्ही तुमचा घरचा प्रतिनिधी बनवला. या शहरात, या जिल्ह्यात, या मतदारसंघात जे जे विकासाची कामं आहेत. त्याकडे रोहितचं लक्ष आहे. या तालुक्यात दहा वर्ष एक आमदार होता. तो पाच वर्ष मंत्री होता. काय दिवे लावले त्यांनी? या दहा वर्षात केलं काय? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु, शरद पवारांनी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांना संधी दिली जाईल, असं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT