Supriya Sule: टेक्सटाइल पार्कमध्ये आईला अडवलं, सुप्रिया सुळेंच्या जिव्हारी लागलं.. अजितदादांना भडाभडा सुनावलं!
Supriya Sule Baramati Speech: बारामतीच्या टेक्सटाइल पार्कमध्ये शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाकाकी पवार आणि नात रेवती सुळे यांना प्रवेश करण्यापासून रोखलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
प्रतिभाकाकी पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये नो एन्ट्री!
सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर केली टीका
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
Supriya Sule Baramati Speech: बारामतीच्या टेक्सटाइल पार्कमध्ये शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाकाकी पवार आणि नात रेवती सुळे यांना प्रवेश करण्यापासून रोखलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रतिभाकाकी पवार यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केल्याचं समोर आलं होतं. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सुळे म्हणाल्या, "बाकी आम्ही काही केलं असेल.. पण बारामतीत ईडी नाही आम्ही आणली. मला प्रश्न विचारायचाय त्यांना.. ही तुमची मलिदा गँग.. त्या मलिदा गँगला मला एक प्रश्न विचारायचा आहे. काल टेक्सटाईल पार्कमध्ये एक घटना झाली. मी नाही काढणार ते.. माझ्यावरचे संस्कारच नाही ते. ठीके अर्धा तास थांबले, त्यांना अडवलं काही फरक पडत नाही.
ADVERTISEMENT
सुळे पुढे म्हणाल्या, "तुम्ही मोठे आहात, तुमची सत्ता आहे.. तुमचं नाव त्या पदावर..अधिकार आहे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवायची. सगळं त्यांनीच केलं अशी ते भाषणं करतात ना..म्हणजे MIDC त्यांनीच काढलं, विद्या प्रतिष्ठान त्यांनीच काढलं. साहेबांनी तर काहीच केलं नाही ना.. कारण त्या मलिदा गँगने एवढं गुरफटलंय ना त्यांनी..."
हे ही वाचा >> Ajit Pawar Baramati : लोकसभेला एकटा होतो, पण आता माझी आई, बहिणींची साथ... अजितदादा कडाडले
"मला तो प्रश्न विचारायचा आहे.. ते टेक्सस्टाइल पार्क पवार साहेबांनी मंत्री असताना बारामतीत आणलं. 6 हजार लोकं कामाला असायची तिथे. 50 टक्के तिथल्या फॅक्टरी आज बंद आहेत. या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला शब्द देते की, मी स्वत: त्या टेक्सटाइल पार्कमध्ये लक्ष घालीन आणि 100 टक्के क्षमतेने ते टेक्सटाइल पार्क तुम्हाला सुरू करून देईन.अजून एक गोष्ट सांगते माझ्या कानावर आलेली. पण ती तुम्हाला सांगावी लागेल. माझ्यावर त्या पत्रात टीका झाली. की, सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आलेल्यांना 1500 रुपयांची काय किंमत? अरे हो.. सोन्याचा चमचा घेऊन आलीए जन्माला आलीए, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Sharad Pawar: "देशाची चिंता वाटत होती, कारण नरेंद्र मोदी...", शरद पवार नेमकं काय म्हणाले?
मी या ज्या 6 सोन्याच्या बांगड्या घालतेय ना.. या बांगड्या शारदाबाई पवारांच्या आहेत. माझी आजी जोपर्यंत होती तोपर्यंत त्यांच्या हातात या बांगड्या होत्या. माझी आजी गेली तेव्हा त्या आईला दिल्या. आई घालत नाही सोन्याचं म्हणून त्या कपाटात ठेवायची. माझ्या लग्नात त्या मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस.. माझी ताकद कुठून येत तर शारदाबाईच्या या सहा बांगड्यांमधून येते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT