Chhagan Bhujbal : ''औकातीत राहा बेट्या हो...'', भुजबळांची जरांगे पाटलांवर बोचरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

 chhagan bhujbal criticize manoj jarange patil government delegation meet obc protester laxman hake navnath waghmare girish mahajan dhananjay munde
ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं.
social share
google news

Chhagan Bhujbal Criticize Manoj Jarange Patil : गौरव साळी, जालना :  ''लोकं म्हणतात आम्ही जातीवाद केला, पण आम्ही जातीवाद नाही केला. जे बसले आहेत ना तिकडे त्यांनी (जरांगे) केला. औकीतत राहा बेट्या हो… आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही. कुठेही न्याव, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) टीका केली. (chhagan bhujbal criticize manoj jarange patil government delegation meet obc protester laxman hake navnath waghmare girish mahajan dhananjay munde) 

ADVERTISEMENT

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या भेटीला आज सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं. या भेटीनंतर शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन हाकेंनी उपोषण सोडलं आहे. तसेच शिष्टमंडळाच्या भेटीनंतर ओबीसी आंदोलकांनी तात्पुरत आंदोलन स्थगित केलं आहे. 

या आंदोलनस्थळी संबोधित करताना भुजबळ म्हणाले की, औकीतत राहा बेट्या हो… आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही. कुठेही न्याव, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. तसेच ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही. मी त्याला बोलण्याऐवजी हाकेंसोबत त्याने चर्चा करावी मग आमच्याकडे यावं, असा सल्ला भुजबळांनी जरांगेंना दिला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :Govt Job: निवांत नोकरी, भरघोस पगार... माझगाव डॉकयार्डमध्ये 8वी-10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! 

तुम्ही कोणत्या पक्षात आहात याचा माझ्याशी काही संबंध नाही. पण ज्या पक्षात आहात त्यातून ओबीसीचं  सरंक्षण करण्यासाठी पुढे या. जर तुम्ही 54 टक्के एक राहिलात,तर तुमच्याबरोबर दलित, आदिवासी, मुस्लिम एक राहतील. पण तुम्ही जर आपापसात लढत राहिलात तर काहीही होणार नाही. एकत्रित राहा. तो मोठा, मी मोठा हा भेदभाव नाही. आम्ही सगळे सारखे, असे समजून कामाला लागले पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी आंदोलकांना केले. 

कालच्या मीटींगमध्ये ठरलं की कुणबी दाखले खोटे आहेत. पण जे कुणबी आहेत, त्यांना माझा विरोध नाही. ज्यांनी खोटे दाखले दिले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. काही लोक ओबीसीत जातात तिथला फायदा घेतात. त्यानंतर मग EWS मग SEBC असं एकच माणूस तीन तीन ठिकाणी जातो आणि तिन्ही ठिकाणाहून फायदा घेतोय, असा भुजबळांनी आरोप केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ''भर पावसात तरूणांना राबवून घ्या'',पोलीस भरतीवरून काँग्रेसचा महायुतीवर हल्ला

आमच्या ओबीसीची पण उपसमिती नेमा, ही मागणी कालच्या बैठकीत सगळ्यांनी मान्य केली आहे. येणाऱ्या अधिवेशनात आम्ही या दोन उपोषणकर्त्यांना बोलवणार, त्यात आम्ही भूमिका मांडणार आहोत. गिरीश महाजन यांनी काल सांगितलं सगे सोयरे कोर्टात टिकत नाही. आपला ओबीसींचा लढा बळकट करण्यासाठी अनेक हात सोबत आले आहेत.जंग लगी तलवार अब धार लगानी होगी, कूछ लोग आपणी औकात भुल गये उन्हे आपनी याद दिलानी होगी, असा शायरीच्या माध्यमातून भुजबळांचा जरांगेंना टोला. 

ADVERTISEMENT

22 जूनला झालेल्या चर्चेनुसार इतर मागास प्रवर्गातील मागण्यांबाबत चर्चा झाली.काही मागण्यांवर निर्णय घेण्यात आले, काही बाकी आहे. ज्या मागण्या बाकी आहेत, त्या अधिवेशन काळात बैठक घेऊन पूर्ण करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारने याबाबत लेखी आश्वासन दिले आहे, असे भुजबळांनी सांगितले. दरम्यान बैठकीतला तपशील सांगितल्यानंतर भुजबळ यांच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण सोडलं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT