Bhaskar Jadhav : विरोधी पक्षाच्या आमदारांकडून शपथविधीवर बहिष्कार! भास्कर जाधवांनी सांगितलं खरं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Bhaskar Jadhav On Mahayuti Government
Bhaskar Jadhav On Mahayuti Government
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार का टाकला?

point

"आमदार म्हणून शपथ घ्यावीच लागणार आहे, पण..."

point

भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?

Bhaskar Jadhav On EVM:  राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला पार पडला असून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. ईव्हीएम हॅक करून महायुतीने बहुमत मिळवलं आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज सभागृहात शपथविधीवर बहिष्कार टाकला. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. 

ADVERTISEMENT

भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले? 

"आम्ही राष्ट्रगीतासाठी म्हणून सभागृहात हजर होतो. परंतु, आम्ही शपथविधी करून घेतला नाही. त्याचं कारण स्पष्ट आहे. सोलापूर जिल्ह्यात मारकडवाडीत ग्रामस्थांनी स्वत:च्या गावात मतदान कुणाला मिळालं, याची खात्री करण्यासाठी त्यांनी मतदानाची प्रक्रिया जाहीर केली. ही मतदानाची प्रक्रिया, सरकारच्या कोणत्याही निर्णयावर, निवडणूक आयोगाच्या कोणत्याही निर्णयावर परिणाम करणारी नव्हती. जनतेनं कोणला मतदान दिलं, हे जनतेला स्वत: तपासून घ्यायचं होतं.

हे ही वाचा >>  Sharad Pawar: "...तेव्हा EVM ची तक्रार नव्हती", शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल! नेमकं काय म्हणाले?

परंतु, हे सरकार इतकं घाबरलं, निवडणूक आयोग इतकं घाबरलं की त्यांनी तिथे बंदी हुकूम जारी केला. 144 कलम लागू केलं. हे कलम लावून ती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. ईव्हीएम मशिनमुळेच हे सरकार सत्तेत आलं आहे, हे अधोरेखीत झालं. म्हणून आम्ही आज सभागृहात शपथविधीला बहिष्कार टाकला". 

हे वाचलं का?

महाविकास आघाडीचे आमदार उद्या शपथ घेणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देताना जाधव म्हणाले, आमदार म्हणून शपथ घ्यावीच लागणार आहे. शपथ घेतली पाहिजे. आमदार म्हणून जे वैधानिक अधिकार आम्हाला असतात, ते जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाहीत, तोपर्यंत ते वैधानिक अधिकार आम्हाला प्राप्त होत नाहीत. वैधानिक अधिकार जर प्राप्त झाले नाहीत, तर आम्हाला या सिस्टीमविरोधात जो लढा द्यायचा आहे, त्यात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे आम्ही शपथ घेण्याचा निर्णय घेणार आहोत. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 'त्या' महिलांना मिळणार नाहीत 2100? CM फडणवीसांनी केली घोषणा

2 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड होत आहे. महायुतीकडे खूप मोठं संख्याबळ आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सक्रीय सहभाग राहील की नाही? यावर बोलताना जाधव म्हणाले, "पूर्वीपासून महाराष्ट्राची उच्च परंपरा होती. अध्यक्षाची निवड बिनविरोध झाली, तर उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाला दिलं जात होतं. परंतु, 1999 मध्ये युतीकडून चूक झाली. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध अध्यक्ष निवडून देण्याची प्रथा मोडीत काढली".

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT