Uday Samant: "ईव्हीएममध्ये घोळ..."; विधानसभा अध्यक्षांची निवड होताच उदय सामंत 'हे' काय बोलून गेले
Uday Samant Press Conference: राज्याच्या विधानसभेच्या आजच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकरांचं अभिनंदन केलं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड
आमदार आणि माजी मंत्री उदय सामंतांचं मोठं विधान
ईव्हीएमबाबत सामंत नेमकं काय म्हणाले?
Uday Samant Press Conference: राज्याच्या विधानसभेच्या आजच्या शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी नार्वेकरांचं अभिनंदन केलं. अशातच शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. रत्नागिरीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली की, पक्षविरोधी कामं केलेल्यांना शिक्षा मिळावी, यावर उदय सामंत म्हणाले, "हिंदुत्त्वाचा मुद्दा आणि माझ्या मतदारसंघात उबाठाच्या लोकांनी घेतलेली शपथ याचा काही संबंध येत नाही. बांगलादेशात भारतातल्या हिंदू कम्युनिटीवर जो अन्याय होत आहे, त्यासाठी उद्या 10 ते 1 या वेळेत विश्व हिंदू परिषदेमार्फत धरण आंदोलन केलं जाणार आहे. त्यामध्ये शिवसेनेमार्फत मी देखील सहभागी होणार आहे. हा विषय झाला हिंदुत्त्वाचा.
ADVERTISEMENT
काल माझ्या मतदारसंघात प्रचाराबाबत जी शपथ घेतली, ते पाहून मला असं वाटतं हा लोकशाहीला घातक प्रकार आहे. परमेश्वराच्या चरणी लीन होणं, हे मी समजू शकतो. परंतु, परमेश्वराचा, दर्ग्याचा वापर हा मतदान केलंय की नाही, यासाठी करणं योग्य आहे की नाही, हे उबाठाच्याच नेत्यांनी सांगितलं पाहिजे. ईव्हीएममध्ये घोळ असू शकतो. पण देवाकडे जाऊन मतदान केलंय की नाही, अशापद्धतीचा दबाव पदाधिकारी जेव्हा आणतात, त्याचा खुलासा उबाठाच्याच पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे, असं माझं मत आहे".
हे ही वाचा >> Raj Thackeray : "विरोधाला बळी पडता या अधिवेशनातच वक्फ...", लातूरमधील प्रकरणावर काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या प्रश्नाबाबत नव्या सरकारला तोडगा काढला येईल का? यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, अडीच वर्षाचा साक्षीदार मी आहे. जत आणि त्या परिसरात नळपाणी योजनांची कामे त्याआधीच्या अडीच वर्षात थांबली होती. त्या नळपाणी योजनांसाठी 1800 कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केली. कॅनोलची कामेही आम्ही पूर्ण केली. सीमा भागातील मराठी संस्थांना जे अनुदान बंद झालं होतं, ते देखील सुरु करण्याचं काम शिंदेंच्या मागच्या सरकारमध्ये झालं. त्यामुळे मागील अडीच वर्षात आमच्या सरकारनं आम्ही मराठी भाषिक आणि सीमा भागातील लोकांसोबत आहोत, हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलं आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> 9 December 2024 Gold Rate: ग्राहकांनो! आजच सोनं खरेदी करण्याची 'सुवर्ण' संधी, मुंबईसह 'या' शहरांमध्ये भाव घसरले
"जयंत पाटील साहेबांचं आजचं भाषण उल्लेखनीय होतं. त्यांनी सभागृहात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यामुळे काही लोकांनी स्वत:चं आत्मचिंतन केलं पाहिजे. जयंत पाटील साहेबांसारखा सीनियर नेता काही गोष्टी सभागृहात मांडतो, तेव्हा त्यांच्या अनुभवाचा उपयोग आजूबाजूच्या मित्रपक्षांनीही करून घेतला पाहिजे", असंही सामंत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT