Police Bharti : ''भर पावसात तरूणांना राबवून घ्या '',पोलीस भरतीवरून काँग्रेसचा महायुतीवर हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra Congress,  amravati police bharati video,  devendra fadnavis, police bharti 2024
पावसाळ्यात शारीरिक चाचणी घेत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले.
social share
google news

Congress Criticize Mahayuti : महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल 17 हजार 471 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला 19 जूनपासून सुरुवात झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. यामुळे पावसाळ्यात शारीरिक चाचणी घेत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. तसेच अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे पोलीस भरती वादात सापडली होती. या मुद्यावरूनच आता काँग्रेसने महायुती सरकारला घेरले आहे. (congress criticize mahayuti government on police bharati amravati police bharati video devendra fadnavis) 

ADVERTISEMENT

महाराष्ट्र काँग्रसने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये काँग्रेसने पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर लिहण्यात आलेल्या कॅप्शनवरून हा व्हिडिओ अमरावती जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या असल्याचा अंदाज आहे. या व्हिडिओत पोलीस भरतीतील विद्यार्थी पावसाळ्यात शारीरिक चाचणी देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याच प्रकारावरून आता महाराष्ट्र काँग्रेसने महायुती सरकारला टीका केली आहे.''भर पावसात घ्या राबवून तरुणांना,त्यांचा एल्गार मात्र ऐका विधानसभेला''अशा शब्दात काँग्रेसने महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. 

हे ही वाचा : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मेहुण्याचा आर्थर रोड कारागृहात मृत्यू! नेमकं घडलं काय?

दरम्यान मुसळधार पावसामुळे याआधीच राज्यातील नांदेड आणि अमरावती ग्रामीण पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी जेथे पाऊस असेल तेथे चाचणी पुढे ढकलली जाईल, असा निर्णय घेतला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ओबीसींच्या बैठकीत काय घडलं... भुजबळ एवढे का संतापले?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

दरम्यान जेथे पाऊस असेल तेथे चाचणी पुढे ढकलली जाईल. यातबरोबर बऱ्याच ठिकाणी मुले बाहेरून आलेली आहेत. कोणतीही सोय नसल्यामुळे मुले बसस्थानक व इतर ठिकाणी राहतात. अशा ठिकाणी तेथील पोलीस स्थानकांनी त्यांच्या अधिकारात पोलीस स्थानक घेऊन या मुलांच्या निवासाची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT