Priyanka Gandhi: "मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी...", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
Priyanka Gandhi Gadchiroli Speech: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी सभांचा धडाका उठवला आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारसभेसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रणशिंग फुंकलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा
"भाजपचे मोठे नेते शिवरायांचं नाव घेतात आणि त्यांचा अपमान करतात..."
गडचिरोलीच्या सभेत प्रियांका गांधी नेमकं काय म्हणाल्या?
Priyanka Gandhi Gadchiroli Speech: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी सभांचा धडाका उठवला आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारसभेसाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रणशिंग फुंकलं आहे. आज गडचिरोलीच्या सभेतही प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. गांधी म्हणाल्या, "तुम्ही शाळेची फी भरू शकत नाहीत. खाण्याचे पदार्थ आणि कपड्यांवर जीएसटी आहे. एव्हढी महागाई आहे की, तुम्ही टॅक्सवर टॅक्स भरत आहात. तुम्ही टॅक्स भरत आहात आणि ह्यांच्या मोठ्या उद्योगपतींचं टॅक्स जिथं होतं तिथेच आहे. त्यांचं टॅक्स कुणीच वाढवलं नाही. यांनी मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ केले आहेत. आज शेतकरी संकटात आहे. त्याला पैसै कमावता येत नाहीत. प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्याला पैसे कमवणं कठीण बनलं आहे. आज एव्हढे संकटं आहेत की त्या दलदलीतून तुम्हाला बाहेर निघता येत नाही. अशी परिस्थिती इथे आहे".
ADVERTISEMENT
जनतेला संबोधीत करताना प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपचे मोठे नेते शिवरायांचं नाव घेतात आणि त्यांचा अपमान करतात. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. काँग्रेसने दिलेली आश्वासनं पूर्णही केली. पण यांच्याकडून धर्म आणि जातीचं राजकारण केलं जातंय. तुमच्या जमिनी खाणकामासाठी दिल्या जात आहेत. वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुमच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. अदानींसारख्या उद्योगपतींसाठी सर्व काही केलं जात आहे. पण तुमच्या सुरक्षेचा विषय कमकुवत केला जात आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये वनाधिकार कायद्यातून जंगल, पाणी आणि जमिनीवर आदिवासींना हक्क दिला होता. ही तुमची परंपरा आहे. हे तुमच्या हक्काचं आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "गद्दारा पहिले तू माझ्या वडिलांचा फोटो...", उद्धव ठाकरेंची CM शिंदेंवर घणाघाती टीका
आज संपूर्ण विश्वास लोक म्हणतात, पाणी, जमिन, आमचे डोंगर आणि जंगलांचा आदर केला पाहिजे. ही संपत्ती राखून ठेवली पाहिजे. नाहीतर आपली संपूर्ण पृथ्वीचं नष्ट होईल. तुमचे सर्व प्रश्न इंदिराजींना माहित होते. म्हणून तुमच्याशी त्यांचं नातं खूप मोठं होतं. महाराष्ट्रात 4 लाख आदिवासींनी एफआरए क्लेम केलं आहे. यातील 2 लाख आदिवासींचं क्लेम रद्द करण्यात आलं आहे. संपूर्ण देशात 22 लाख आदिवासींच्या जमिनीवर क्लेम करण्यात आला आहे. जमिनीवर असलेला तुमचा हक्क काढून घेतला जात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या बॅगा बाहेर जाताना नाही, घरी येताना चेक केल्या पाहिजे, शिंदे काय म्हणाले?
ADVERTISEMENT