Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या बॅगा बाहेर जाताना नाही, घरी येताना चेक केल्या पाहिजे, शिंदे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंच्या बॅग चेक करण्याच्या व्हिडीओची चर्चा

point

बॅग चेक करण्याच्या मुद्द्यावरुन शिंदेंचा ठाकरेंना टोला

point

उद्धव ठाकरेंना काय म्हणाले शिंदे?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्ष दंड थोपटून मैदानात उतरलेले आहेत. नेत्यांच्या प्रचार सभांमधील भाषणांनाही आता चांगलीच धार आली आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोग, पोलीस आणि संपूर्ण प्रशासनही तयारीत आहे. नेते मंडळींच्या बॅग तपासण्याचा धडाकाच सध्या यंत्रणांनी लावला आहे. याची सुरूवात झाली ती उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासताना टाकलेल्या एका व्हिडीओपासून. त्यावरुनच आता एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांची बॅग वणीमध्ये हेलिकॉप्टर उतरल्यावर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तपासली होती. त्यावेळी प्रश्नांची सरबत्ती करत उद्धव ठाकरेंनी त्यांचा व्हिडीओ घेतला होता. त्यावरुन एकनाथ शिंदे यांनी त्यांना टोला मारला आहे. उद्धव ठाकरे बाहेर जाताना त्यांच्या बॅगमध्ये काही नसतं, त्यांच्या बॅग घरी यताना चेक केल्या पाहिजे असं शिंदे म्हणालेत.

हे ही वाचा >>Amit Shah : विदर्भातले सगळे दौरे रद्द, अमित शाह तातडीने दिल्लीला रवाना, नेमकं कारण काय?

शिंदे काय म्हणाले?

"उद्धव ठाकरे यांनी आता रोज बॅगचं लावलंय... अरे त्यांचं रूटीन वर्क आहे... ते सगळ्यांच्या बॅग चेक करतायत" असं शिंदे म्हणाले. तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्हाला माहिती आहे, त्यांच्या बॅगांमध्ये बाहेर जाताना काही नसणार, घरी येताना त्यांच्या बॅगा चेक करायला पाहिजे, कारण त्यांना घेणं माहिती आहे, देणं नाही."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात मागच्या पाच वर्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडून गेल्या. भाजपची भूमिका न पटल्यानं उद्धव ठाकरे यांनी महायुतीमधून बाहेर पडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. कोविड काळ संपताच अडीच वर्ष पूर्ण झाल्यावर हे सरकार कोसळलं. याला कारण ठरलं ते एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय. शिंदेंनी वेगळी भूमिका घेतल्यानं महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपर्यंत हा वाद कायम आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात दंड थोपटून उतरलेले आहेत. 

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT