Nagpur : निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये 14 कोटींचं सोनं जप्त, गुजरातहून आणल्याची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

AI Image
AI Image
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई

point

जप्त केलेलं सोनं गुजरातहून नागपुरात आल्याची माहिती

point

निवडणूक आयोग आणि पोलीस सतर्क

Maharashtra Assembly Elections Nagpur : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून यंत्रणांचं राजकीय मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष आहे. रोख रक्कम, सोनं आणि इतर मालमत्तांच्या वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवलं जातंय. आता नागपूरमध्ये मोठी कारवाई झाली आहे. तब्बल 14 कोटी रुपयांचं सोनं जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. 

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी मुंबईत 80 कोटी रुपयांच्या चांदीनंतर आता नागपुरात 14 कोटींहून अधिक किमतीचं सोनं जप्त करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, त्यामुळे या घडामोडींवर आणखी बारीक लक्ष ठेवण्याचं काम पोलीस आणि निवडणूक आयोग करत आहेत, अशातच नागपूरमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
 

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये झालेल्या कारवाईमध्ये दागिने आणि बिस्किटांच्या स्वरूपात सोन्याची वाहतूक केली जात होती. गुजरातस्थित कंपनी सिक्वेल लॉजिस्टिकद्वारे ही वाहतूक केली जात होती. पथकाने वाहनांची रस्त्यात तपासणी केली असता, त्यांनी हे वाहन पकडलं. गुरुवारी नागपूर विमानतळावर हे सोनं आलं आणि त्यानंतर ते अमरावतीला पाठवलं जात होतं अशी माहिती आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>Pankaja Munde : "भाजपने बाहेरुन निवडणुकीसाठी 90 हजार लोक आणलेत, इथला ऑक्सिजन कमी झाला"

 

अंबाझरी तलावाकडून वाडीकडे जाताना वाहन थांबविण्यात आले. हे सोने जप्त करून अंबाझरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याची चौकशी केली असता, निवडणुकीचा काळ सुरू असताना  एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं घेऊन जाण्यासाठी सिक्वेल लॉजिस्टिकला निवडणूक आयोगाची परवानगी नसल्याचंही आढळून आलंय.

ADVERTISEMENT


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT