BJP Manifesto : लाडकी बहीणचे पैसे वाढवणार ते शेतकऱ्यांना मदत, भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मुद्दे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध

point

शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा

point

लाडक्या बहिणींनाही मोठं आश्वासन

BJP Manifesto for Vidhan Sabha :  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज आपला जाहीरनामाम प्रसिद्ध केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित आज भाजपने आपला हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, विनोद तावड, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भाजपच्या जाहीरनाम्यात प्रामुख्याने महिला, विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्यात आहे. आज 10 नोव्हेंबरच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पराभूत केलं होतं, त्याच शिवशक्तिच्या प्रेरणेने काम करणारे नेते हा अर्थसंकल्प सादर करत आहेत असं म्हणत भाजपकडून या पत्रकार परिषदेची सुरूवात करण्यात आली. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Sanjay Raut : लाडक्या बहिणींना पैसे काय मोदी, शाह, फडणवीस, शिंदेंच्या... महाडिकांच्या वक्तव्यावर राऊत भडकले

 

भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे

  • लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये
  • शेतकऱ्यांसाठी भावान्तर योजना (हमीभावाने खरेदी होणार नाही, त्याठिकाणी फरकाची रक्कम खात्यात टाकणार)
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
  • प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क
  • वृद्धांची पेन्शन 2100 (सहायतेच्या योजनांमध्ये वाढ करणार)
  • जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार
  • 25 लाख रोजगारांची निर्मिती 
  • 10 लाख विद्यार्थ्यांना वेतन
  • गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन 30 टक्के कमी करणार
  • विज्ञान तंत्रज्ञान : मेक इन महाराष्ट्राला प्रभावीपणे राबवणार
  • महाराष्ट्राला फिनटेक आणि एआयचं हब करू
  • एअरोनॉटिकल आणि स्पेसमध्ये उत्पादनावर काम करू
  • अक्षय अन्न योजना
  • महारथी : एआय लॅब्स
  • कौशल्य जनगणना करणार 
  • छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र
  • हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करत असेल तर भावात्तम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार
  • अडीच वर्षांमध्ये 1 लाखापेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या.

 

हे वाचलं का?

भाजप सरकारने मागच्या दहा वर्षात मोठी कामं केली असं सांगताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. तुम्ही केलेल्या कामांचा हिशोब तुम्ही जनतेसमोर ठेवा. आघाडी सरकारच्या काळात जनतेला खूप त्रास सहन करावा लागला असं अमित शाहा म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवारच्या कामांचंही कौतुक केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT