Maharashtra Chief Minister: मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंकडून असं दबाबतंत्र? मोदी-शाहांच्या मनात काय?
विधानसभा निवडणूक 2024 एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढवल्या गेली. या निवडणुकीत महायुतीला विजय मिलाला. त्यामुळे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच करावं अशी मागणी शिंदेंच्या शिवसैनिकांकडून, आमदारांकडून होत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस?
शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर दावा कायम?
Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलंच यश मिळालं. यामध्ये एकट्या भाजपला 133 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीने तब्बल 200 पार गेली आहे. यामुळे महायुतीचं जोरदार सेलीब्रेशन सुरू आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलेलं नाही. गेले अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महायुती सरकारचं नेतृत्व केलं. या निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वात लढवल्या गेल्या. त्यामुळे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच करावं अशी मागणी शिंदेंच्या शिवसैनिकांकडून, आमदारांकडून होत आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात जास्त जागा भाजपला मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपने 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळवला. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 57 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. यंदा भाजप या एकट्या पक्षाला मिळालेल्या एवढ्या जागा हे यश फार मोठं मानलं जातं आहे. तर दुसरीकडे शिंदेंनी केलेल्या कामांमुळेच जनतेने हे सरकार पुन्हा निवडलं अशी भावना शिवसेनेच्या आमदारांचीही आहे. निकाल लागल्यानंतर काल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी वर्षा बंगल्यावर येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औक्षण केलं आणि एकनाथ शिंदेच यापुढे मुख्यमंत्री राहावेत यासाठी सदिच्छा दिल्या. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा कायम असल्याचं बोललं जातं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं दबावतंत्रांचाही वापर होऊ शकतो अशी शक्यता आहे.
हे ही वाचा >>Assembly Elections Result : मविआच्या आमदारांची संख्या घटली; पवार, राऊत, चतुर्वेदींच्या राज्यसभा खासदारकीचं काय होणार?
आज मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे उपचार मिळालेले आणि आजारातून बरे झालेले शेकडो रुग्ण एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सिद्धिविनायक मंदिरात सामूहिक प्रार्थना करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसंच, मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी लावलेले होर्डिंगही बरंच काही सांगून जात आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरच महायुतीने राज्यात दणदणीत विजय मिळवला असं म्हटलं जातं आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Raj Thackeray MNS : "भाजप सोबत जाणं ही चूक", मनसेच्या बैठकीत उमेदवारांकडून नाराजी - सूत्र
राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना, नेत्यांना बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मागच्या काही दिवसांमध्ये भाजपने मोठी मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या यशाचं श्रेय भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना दिलं जातंय. तसंच भाजपने मिळालेल्या आमदारांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे भाजपचाही फडणवीसांना मुख्यमंत्री करावं असा आग्रह असणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे अखेर काय निर्णय होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT