Rohit Pawar : रोहित पवार पिछाडीवर पडल्याच्या धक्क्यात 75 वर्षांच्या समर्थकाचा मृत्यू, ट्विट करुन...

सुधीर काकडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रोहित पवार यांच्या समर्थकाचा मृत्यू

point

धक्का बसल्यानंतर काय म्हणाले रोहित पवार?

point

कर्जत जामखेडमध्ये काय घडलं होतं.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला आता पूर्णविराम लागला असून, आता फक्त मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे. काल झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्यानं महायुतीचे उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीसाठी तर यंदाचा निकाल हा धक्कादायक ठरला आहे. अनेक मोठे नेत्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. रोहित पवार यांच्यासाठीही ही निवडणूक काहीशी अटीतटीचीच होती, पण अखेर त्यांचा विजय झाला. यानंतर काल विजयी गुलाल उधळलला गेला. मात्र काल कर्जत-जामखेडमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे रोहित पवार यांना भावनिक धक्का बसला आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Result : लाखाच्या लीडने जिंकणाऱ्या आमदारांची यादी; अजितदादा, शिंदेंचा नंबर कितवा?

राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातली लढत मोठी अटीतटीची होती. या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी सुरू असतानाच एक धक्कादायक प्रकार घडला. रोहित पवार हे काही वेळ पिछाडीवर होते. राज्याचं लक्ष या लढतीकडे असताना, रोहित पवार यांचे समर्थकही या निकालाकडे नजर लावून बसले होते. यावेळी 75 वर्षांचे शरद पवार यांचे एक निष्ठावान कार्यकर्ते यजेराव काळे सुद्धा घडामोडींवर नजर ठेवून बसले होते. रोहित पवार पिछाडीवर पडल्याचं कळताच त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावरुन आज रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
 

रोहित पवार काय म्हणाले? 

"काल मतमोजणी सुरु असताना मताधिक्य कमी-जास्त होत असल्याच्या बातम्या पाहून माझ्या प्रचारात आघाडीवर असलेले आणि आदरणीय पवार साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते यजेराव दिनकर काळे (वय, ७५, रा. शिंपोरा) यांना धक्का बसला आणि यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. माझ्यासाठी ही अत्यंत दुःखद घटना आहे. या घटनेने विजयाचा आनंद झाला त्यापेक्षा कितीतरी पट अधिक दुःख झालं. निवडणुकीत कार्यकर्ता किती महत्त्वाचा असतो आणि एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला आपण अशा पद्धतीने गमावलं तर त्याचं दुःख किती असतं, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतोय. हे मनाला अत्यंत वेदना देणारं आहे. काळे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत."

हे वाचलं का?

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT