Sushma Andhare: "बाळासाहेबांना खुनी म्हणणाऱ्या निलेश राणेंना...", सुषमा अंधारेंनी CM एकनाथ शिंदेंना सुनावलं
Sushma Andhare On CM Eknath Shinde: आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सिंधुदुर्गच्या सभेत सुषमा अंधारेंचा निलेश राणेंवर हल्लाबोल
सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा
सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाले?
Sushma Andhare On CM Eknath Shinde: आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावले आहेत. मी शिंदेंना प्रश्न विचारते, तुम्ही जर बाळासाहेबांची शिवसेना म्हणत आहात. मग त्याच बाळासाहेबांना खुनी म्हणणारे आणि माझ्यासाठी बाळासाहेब नाही तर राणेसाहेब महत्त्वाचे आहेत, असं म्हणणाऱ्या निलेश राणे यांच्यासाठी तुम्ही मत मागणार आहात का? जर ते मत मागणार असतील तर त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते मत मागणार असतील तर त्यांनी निलेश राणे यांची हकालपट्टी केली पाहिजे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शिंदेंवर घणाघात केला. त्या सिंधुदुर्ग येथे शिवसेना ठाकरे गटाच्या सभेत बोलत होत्या.
ADVERTISEMENT
ज्या लोकांना अजूनही निवडणुकीचा सुर सापडलेला नाही. लाडक्या बिडक्या योजना आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या लक्षात आलं आपण काही केल्याने लाडके होत नाही. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीचा सूर सापडत नाहीय. म्हणून ते बटेंगे तो कटेंगे आणि धर्मामध्ये कंपार्टमेंट तयार करण्याचं आणि विद्वेशाची भाषा करण्याचं काम करतात. भाजपकडे विकासाचा मुद्दा नाही, असं म्हणत अंधारेंनी विरोधकांवर सडकून टीका केली.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : थंडी गेली कुठे? दमट हवा, ढगाळ वातावरण! राज्यात पुन्हा पावसाची एन्ट्री?
सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाल्या, जात आणि धर्माच्या पलीकडे देवेंद्र फडणवीस जाऊ शकत नाहीत. माणूस आणि माणसाच्या संवेदना यावर देवेंद्र फडणवीस आयुष्यात बोलू शकत नाहीत. कारण देवेंद्र फडणवीस यांचे गलिच्छ राजकारण हे जात आणि धर्माच्या भोवतीच घुटमळत राहिलं आहे. इतरांना जातीवादी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं हे वाक्य बघा किती धार्मिक विद्वेषी आहे, किती जातीवादी आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ajit Pawar: 'प्रतिभा काकींना विचारणार, अजितला पाडण्याकरिता त्या घरोघरी...?', अजितदादा असं का म्हणाले?
उद्धव साहेबांनी जे म्हटले ते व्यापक अर्थाने घ्या. जी खाली भाजपा आहे ते सगळे नाराज आहेत कारण हक्काची सत्तेची पंगत बसली, त्यावेळी दहा ताट अचानक शिंदेंना काढून द्यावी लागली, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजित पवारांना दहा ताटे काढून द्यावी लागली. अगदी मुंबई पासून ते जिल्ह्याच्या डीपीडीसीपर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटेकरी तयार झाले. त्यामुळे हे कार्यकर्ते उद्विग्न आहेत, अशा या सगळ्या निराश आणि नाराज कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांची नकारात्मक छबी आवडत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी अब्दुल सत्तारांचा समाचार घेतला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT