Tekchand Sawarkar : 'लाडकी बहीण योजना मतांचा जुगाड', तिकीट कापल्यावर पुन्हा तेच म्हणाले भाजप आमदार!
Tekchand Sawarkar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला मतांचा जुगाड म्हणणाऱ्या टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापण्यात आले आहे. यावर मुंबई तकशी बोलताना सावरकर म्हणाले की, 'मी जे बरोबर होतं, तेच बोललोय''. त्यामुळे सावरकरांनी हे विधान करून आपल्याच जुन्या विधानाची पाठराखण केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'मी जे बरोबर होतं, तेच बोललोय'
सावरकरांनी आपल्याचा जुन्या विधानाची केली पाठराखण
बावनकुळेंच्या आधीपासून काम करतोय
Tekchand Sawarkar On Ladki Bahin Yojana : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत कामठी विधानसभा मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट जाहीर केले आहे. त्यामुळे या जागेवरून भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापल गेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानानंतर त्यांचं तिकीट कापलं गेल्याची चर्चा आता रंगली आहे.(maharashtra assembly election 2024 bjp mla tekchand sawarkar big statement on ladki bahin yojana scheme maharashtra politics)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेला मतांचा जुगाड म्हणणाऱ्या टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापण्यात आले आहे. यावर मुंबई तकशी बोलताना सावरकर म्हणाले की, 'मी जे बरोबर होतं, तेच बोललोय''. त्यामुळे सावरकरांनी हे विधान करून आपल्याच जुन्या विधानाची पाठराखण केली आहे. तसेच ज्यांना हे विधान योग्य वाटलं त्यांनी ते अॅक्सेप्ट करा, ज्यांना चुकीच वाटलं त्यांनी सोडून द्या,असा सल्ला सावरकरांनी दिला आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार?
भाजपने कामठी विधानसभेची जागा चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहे. त्यावर माझा कोणताही विरोध नाही. आम्ही पक्षाने जो निर्णय घेतला आहे, त्याचे समर्थन करतो. आणि बावनकुळेंसाठी आम्ही रात्रंदिवस काम करू, असे बावनकुळेंनी म्हटले आहे. आम्हाला पक्षाने याबाबतची कोणतीही पुर्वकल्पना दिली नव्हती. आणि पक्षाने आम्हाला आमची पुढची भूमिका देखील सांगितली नाही. पण मी भापजचे काम करेन आणि माझ्या कार्यकर्त्यांना देखील भाजपचे काम करण्याचे आवाहन करेन, असे सावरकरांनी सांगितले आहे.
हे वाचलं का?
माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही आहे. उलट चांगल्या माणसाला तिकीट देण्यात आलं आहे. ज्या उमेदवाराला तिकीट देण गरजेचं होतं, त्याच माणासाला तिकीट देण्यात आलं आहे.त्यामुळे नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि नाराज होऊन जाणार कुठे, आम्ही पक्षाचे खंदे कार्यकर्ते आहोत आणि गडकरींचे आम्ही कार्यकर्ते आहोत. मी 1992 पासून भाजपसाठी काम करतोय. बावनकुळेंच्या आधीपासून काम करतोय, असे देखील सावरकर यांनी सांगितले.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेविरोधात बँक कर्मचाऱ्यांचं 'या' तारखेला आंदोलन! नेमकं कारण काय?
सावरकर काय बोलले होते?
विजय वड्डेटीवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भाजप आमदार टेकचंद सावरकर हिंदीत भाषण करताना दिसत आहेत. ''अभी हम इतना बडा भानगड काय के लिए किया वह बताओ जरा. इमानदारी से बताओ. अंत:करण से. जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएँगी, तो मेरी ये लाडली बहना, कमल को वोट देंगी, इसके लिए तो हमने यह जुगाड किया. यह सब सहीं बोलते हैं. सब झूट बोलते रहेंगे, मैं सही बोल रहा हुँ. नहीं तो बताने का यह और करने का वोह, हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ता हैं?', असं भाजप आमदार टेकचंद सावरकर या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबरला नागपूरमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सावरकर यांनी हे विधान केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT