Maharashtra Election CNX Exit Poll Results 2024: महाविकास आघाडीला मोठा धक्का, महायुती जिंकणार 'एवढ्या' जागा: सर्व्हे
CNX Exit Poll 2024 | Maharashtra Election 2024 CNX Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून आता CNX चा एक्झिट पोल हा समोर आला आहेत. जाणून घ्या या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात कोणाला मिळू शकतो विजय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपन्न
CNX चा एक्झिट पोल आला समोर
पाहा या एक्झिट पोलनुसार कोणाला मिळणार महाराष्ट्राची सत्ता
Maharashtra Exit Poll Results 2024: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलं आहे. मतदानाची मुदत संपल्यानंतर आता वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल हे आता समोर येऊ लागले आहे. नुकताच CNX चा सर्व्हे हा समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा कोणाची सत्ता येणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात यंदा पहिल्यांदाच सहा प्रमुख पक्ष हे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे निवडणुकीत नेमका कोणाचा विजय होईल हे सांगणं फारच कठीण असल्याचं बोललं जात आहे. अशावेळी एक्झिट पोलमध्ये नेमका काय अंदाज वर्तविण्यात आला आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Exit Poll Results 2024 LIVE Updates: महायुतीचा बोलबाला? पण मॅजिक फिगर कुणालाच नाही? एक्झिट पोल काय?
मतदानाची मुदत संपल्यानंतर आता पहिला सर्व्हे आपल्या हाती आला आहे. CNX या संस्थेने केलेल्या सर्व्हेचे आकडे आता समोर आले आहेत.
CNX चा नेमका EXIT POLL काय?
CNX च्या एक्झिट पोलवर नजर टाकल्यास यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठा धक्का बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
कोणाला किती टक्के मते मिळतील?
एक्झिट पोलनुसार, यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला 46 टक्के मतदान मिळू शकतात. तर काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या महाविकास आघाडीला केवळ 41 टक्के मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय इतरांना एकूण 13 टक्के मिळतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Electoral Edge Exit Poll: महायुती सरकारला धक्का! 'इतक्या' जागांवर MVA मारणार बाजी
-
महाविकास आघाडी आणि महायुतीला नेमक्या किती जागा?
CNX च्या सर्व्हेनुसार अपक्ष आणि इतरांना 6 ते 12 जागा मिळतील. तर महाविकास आघाडी ही 100 ते 119 पर्यंत सीमित राहू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर असा निकाल आला तर हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का ठरू शकतो.
ADVERTISEMENT
दुसरीकडे CNX चा हा सर्व्हे महायुतीसाठी फारच दिलासादायक आहे. कारण यामध्ये 160 ते 179 जागा या महायुतीला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच या सर्व्हेचा विचार केल्यास राज्यात महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात महायुतीला यश येऊ शकतं.
-
माझी लाडकी बहीण योजना ठरणार गेमचेंजर?
विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिने आधी महायुतीने माझी लाडकी बहीण ही योजना आणली. ज्याची अंमलबजावणी देखील अवघ्या काही दिवसात करण्यात आली. ज्याचा परिणाम हा महायुतीसाठी चांगला होऊ शकतो असं कायम बोललं जात आहे. अशावेळी CNX एक्झिट पोल पाहिल्यास जर महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात आली तर त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही त्यांना तारणारी असेल.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT