मुलगा ड्रग्ज प्रकरणात सापडला, चौकशासाठी फोनवर फोन, मोठ्या बिल्डरने थेट स्वत:वर...
गुरुनाथ यांचे महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ मंत्र्यांशीही संबंध होते. गुरुनाथ हे इमारत बांधकाम क्षेत्रातही एक मोठे नाव होते. त्यांची पत्नी किरण डॉक्टर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा मुलानं ड्रग्ज प्रकरणात घालवली

कंटाळलेल्या बापाने थेट स्वत:ला संपवलं

नार्कोटीक्स विभागाने केली होती मुलावर कारवाई
Navi Mumbai : मुंबईच्या नार्कोटिक्स पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये जेएनपीटी बंदरावर 200 कोटी रुपयांच्या ड्रग्जवर छापा टाकला होता. या प्रकरणात नवी मुंबईतील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. हा मुलगा नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांचा मुलगा होता. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी पोलीस गुरुनाथला वारंवार फोन करत असत. या संपूर्ण प्रकरणाला कंटाळून त्याचे वडील गुरूनाथ चिंचकर यांनीच टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या कृत्यामुळे नार्कोटीक्स विभागाकडून वारंवार चिंचकर यांना चौकशीसाठी फोन यायचे. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी स्वत:वर गोळी झाडली.
हे ही वाचा >> UPSC Archit Dongre: मराठमोळा अर्चित डोंगरेने UPSC साठी IT कंपनीतील नोकरी सोडली, अन् देशात आला तिसरा!
मुलगा या प्रकरणात अडकल्यानंतर त्याला चौकशीसाठी अनेकदा फोन यायचे. याच सगळ्याला कंटाळून गुरुनाथ चिंचकर यांनी एनआरआय पोलिस स्टेशनच्या मागे असलेल्या त्यांच्या बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनाथ यांनी ज्या पिस्तूलने गोळीबार केला होता, त्याचा परवाना कालबाह्य झाला होता. गुरुनाथ यांचा मुलगा ड्रग्ज व्यवसायात अडकला होता. त्याने सुधारण्याची संधीही मागितली होती. एका मोठ्या कारवाईत, मुंबई नार्कोटिक्स विभागाने त्याला अटक केली होती.
दरम्यान, या प्रकरणात, पोलीस गुरुनाथ यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावत होते. पण गुरुनाथ पोलिस स्टेशनमध्ये आलेच नाहीत. त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून घेतली. यावेळी त्यांचा मृत्यू झाला. गुरुनाथ यांचे महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ मंत्र्यांशीही संबंध होते. गुरुनाथ हे इमारत बांधकाम क्षेत्रातही एक मोठे नाव होते. त्यांची पत्नी किरण डॉक्टर आहे. पण मुलगा ड्रग्जच्या व्यापारात गुंतला होता.
हे ही वाचा >> 3 महिने सतत... महिला झाली प्रेग्नंट, तिच्या मुलीसोबतही रिजवानचा घाणेरडा खेळ, नेमकं काय केलं?
जेव्हा पहिल्यांदा कारवाई करण्यात आली तेव्हा मुलाने सुधारण्याची संधी मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पण त्यानंतरही मुलगा पुन्हा ड्रग्ज व्यवसायात सामील झाला. यामुळेच गुरुनाथ हे तणावात होते, कारण पहिल्यांदा मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसरी केस खूपच मोठी होती. या संदर्भात त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून आपली समस्या सांगितली होती. पण पोलिसांनी वारंवार चौकशीसाठी बोलावल्याने कंटाळून त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
नार्कोटीक्सच्या अधिकाऱ्यांवर आरोप
सुसाईड नोटमध्ये गुरु चिन्नाकर यांनी नार्कोटिक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या छळाचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलंय की, त्यांचा मोठा मुलगा नवीन हा ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी आहे. तो कित्येक वर्षांपासून कुटुंबापासून दूर परदेशात राहतोय. मुलाच्या कृत्याशी माझा काहीही संबंध नाही, तरीही पोलिस मला, माझ्या पत्नीला आणि धाकट्या मुलाला सतत त्रास देत होते. त्यांनी अधिकाऱ्यांना अनेक वेळा विनंती केली होती, पण कुणी ऐकलं नाही असं चिंचकर म्हणाले आहेत.