Election 2024: महायुती की महाविकास आघाडी.. कोणाला बसणार या 'महाशक्तीचा' सर्वात जास्त फटका?

मुंबई तक

ADVERTISEMENT

'महाशक्तीची' पहिली यादी जाहीर
'महाशक्तीची' पहिली यादी जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टींच्या परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी जाहीर

point

परिवर्तन महाशक्तीने 10 जागांची केली घोषणा

point

परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024 parivartan mahashakti 1st Candidates List: पुणे: विधानसभा निवडणूक 2024 साठी एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे (प्रमुख, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष),  बच्चू कडू (अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष) आणि राजू शेट्टी (संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी राज्यात तिसरी आघाडी स्थापन केली. ज्याला 'परिवर्तन महाशक्ती' (parivartan mahashakti) असं नाव देण्यात आलं आहे. याच 'परिवर्तन महाशक्ती'ची आज (21 ऑक्टोबर) एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली. 

याच परिवर्तन महाशक्तीने विधानसभा निवडणुकीसाठी आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये 10 जागांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक 4 जागा या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत.

हे ही वाचा>> Bjp Candidate 1st List : भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 5 मतदारसंघ खेचले, 'त्या' जागांवर कोण लढणार?

पाहा परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी 

1. ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू
मतदार संघ - अचलपूर
प्रहार जनशक्ती पक्ष

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2. अनिल छबिलदास चौधरी
मतदार संघ - रावेर यावल
प्रहार जनशक्ती पक्ष

3. गणेश रमेश निंबाळकर
मतदार संघ - चांदवड
प्रहार जनशक्ती पक्ष

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> BJP 1st Candidates List: ब्रेकिंग न्यूज... भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी-शाहांकडून अनेकांना धक्का!

4. सुभाष साबणे
मतदार संघ - देगलूर बिलोली (SC)
प्रहार जनशक्ती पक्ष

ADVERTISEMENT

5. अंकुश सखाराम कदम
मतदार संघ - ऐरोली
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

6. माधव दादाराव देवसरकर
मतदार संघ - हदगाव हिमायतनगर
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

7. गोविंदराव सयाजीराव भवर
मतदार संघ - हिंगोली
महाराष्ट्र राज्य समिती

8. वामनराव चटप
मतदार संघ - राजुरा
स्वतंत्र भारत पक्ष

9. 
मतदारसंघ - शिरोळ 
स्वाभिमानी शेतकरी संघटना

10.
मतदारसंघ - मिरज
स्वाभिमानी शेतकरी संघटना 

शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्यात. पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत.

तिसऱ्या आघाडीमुळे कोणाला फायदा होईल?

महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत तिसऱ्या आघाडीच्या प्रवेशानंतर आता त्याचा फायदा कोणाला होणार आणि कोणाचे नुकसान होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. परिवर्तन महाशक्तीच्या स्थापनेची घोषणा करताना संभाजी राजे छत्रपती म्हणाले की, 'निवडणुकीत कोणाचा तरी पराभव निश्चित करण्यापेक्षा आपण आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागावे, जेणेकरून विधानसभेत जनतेचे प्रश्न उचलता येतील.'

पण असं असलं तरी तिसरी आघाडी झाल्याने आता साहजिकच याचा कुणाला तरी फायदा आणि कुणाला तरी नुकसान होणार आहे.

परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जर मनोज जरांगे यांनीही या आघाडीला पाठिंबा दिला आणि प्रकाश आंबेडकर यांचा पक्षही त्यात सामील झाला तर ही तिसरी आघाडी महाविकास आघाडीसाठी नक्कीच अडचणीची ठरू शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास मराठवाड्यातील 46 विधानसभा जागांपैकी 31 जागांवर मविआचे उमेदवार पुढे होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT