Ajit Pawar: 'प्रतिभा काकींना विचारणार, अजितला पाडण्याकरिता त्या घरोघरी...?', अजितदादा असं का म्हणाले?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

पाहा प्रतिभा पवारांना अजितदादा नेमकं काय विचारणार
पाहा प्रतिभा पवारांना अजितदादा नेमकं काय विचारणार
social share
google news

Ajit Pawar on Pratibha Pawar: बारामती: 'प्रतिभा काकी ज्या आईसमान मला आहेत त्या कधीही गेल्या 40 वर्षात अशा घरोघरी जात नव्हत्या. पण त्या घरोघरी जात आहेत. मी कधी तरी भेटल्यानंतर त्यांना विचारणार आहे. माझ्यात असं काय कमी होतं.' असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली. 

ADVERTISEMENT

अजित पवार यांनी बोल भिडू या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रतिभा पवार यांच्याबाबत बोलताना काहीसे हळवे झालेलेही दिसून आले. 

पाहा अजित पवार प्रतिभा काकींबाबत नेमकं काय म्हणाले

'माझा तो मतदार आहे, मी त्याला मान देतोय.. याआधी मी जायला हवं होतं पण मी जाऊ शकलो नाही. आता मला दिवाळीच्या दिवशी सुट्ट्या होत्या तर जाता आलं. दिवाळीमुळे इतर कुठल्या मतदारसंघात काही सभा वैगरे नव्हत्या म्हणून जात नव्हतो. त्यामुळे सकाळी फराळ झाला की, सात वाजता कामाला लागत होतो बारामतीत.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'मला जे वाटतं उमेदवार म्हणून ते-ते मी करणार. तो माझा अधिकार आहे. मी उलट गावोगावी गेल्यावर त्या गावातील लोकं. माझ्या मायमाऊली मला भेटायच्या, बँकेत पैसे आले बरं का.. असं सांगायच्या.' 

'दिवाळीचे दोन दिवस मी 50 गावं फिरलो बारामतीमधील. सगळीकडे माझं स्वागत पण त्यांनी केलं म्हणाले.' 

ADVERTISEMENT

'एक मिनिट तुम्ही मला आता हा प्रश्न विचारला... मग पवार साहेबांनी पण चार सभा घेतल्या. पवार साहेब शेवटच्या सभेला येत होते. ते पण घरोघरी फिरतात.'

ADVERTISEMENT

'आज तिथे आमच्या प्रतिभा काकी ज्या आईसमान मला आहेत त्या कधीही गेल्या 40 वर्षात अशा घरोघरी जात नव्हत्या. त्याही घरोघरी जात आहेत. कधीच घडलेलं नव्हतं. मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय..' 

'कारण त्या स्वत: घरोघरी जात आहेत. मग अजितला पाडण्याकरिता जात आहेत का? मी तर त्यांच्या सर्वात जास्त.. म्हणजे मुलांमध्ये मी काकींच्या जवळ राहिलेलो आहे. प्रतिभा काकींच्या जवळ.. मी कधी तरी भेटल्यानंतर त्यांना विचारणार आहे.' 

'माझ्या असं काय कमी होतं की... सुप्रियाच्या निवडणुकीला त्या कधी एवढ्या फिरल्या नाहीत. त्या माझ्या निवडणुकीला नाही. साहेबांच्या निवडणुकीला फिरायच्या.. ते कधी तर 1967, 72, 78, 80 आणि 85.. 1990 पासून आम्ही लोकं बघायला लागलो. तेव्हापासून यांनी कोणी प्रचार केला नाही. शेवटच्या सभेला यायचे. पण असं फिरलेलं तुम्ही बारामतीकरांना पण विचारा.. कधी नव्हतं.. पण ठीक आहे लोकशाही आहे.' 

'मला त्या दिवशी देखील आश्चर्य वाटलं. तो अधिकार त्यांचा आहे. मी त्याच्यावर टीका-टिप्पणी करत नाही. फॉर्म भरताना.. आम्ही आतापर्यंत 7 वेळा विधानसभेचे, एक वेळेला लोकसभेचा फॉर्म भरला.. कधीही साहेब फॉर्म भरताना आमच्यासोबत आले नाही. सुप्रियाचे फॉर्म मी तीन वेळेला भरले. कधी पवार साहेब आमच्यासोबत सुप्रियाचा फॉर्म भरायला आले नाही.'

'परवा मात्र, मिरवणूक न काढता चार लोकं फॉर्म भरायला गेले.. त्यात साहेब स्वत: गेले. आम्हालाही आश्चर्य वाटतं..' 

'रोहितने फॉर्म भरले.. त्याने दोनदा फॉर्म भरले पण पवार साहेब नाही गेले. मग तुम्ही आमच्या कोणाचे फॉर्म भरायला.. तेव्हा तर आपण एकत्र होतो. आज रोहित पण बरोबर आहे. मग हा दुजाभाव का? मनात शंका येते. भेटल्यावर विचारेन की, एवढा बदल कशामुळे झाला?' असं अजित पवार प्रतिभा पवार यांच्याबाबत म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT