Maharashtra Assembly Elections : राज्यातल्या 'या' मतदारसंघांमध्ये 5 वाजेनंतर झालं 10 टक्के मतदान, फायदा कुणाला?

सुधीर काकडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील मतादानाच्या टक्केवारीची सविस्तर आकडेवारी

point

कोणत्या मतदारसंघांममध्ये उशिरा मतदान

point

उशिरा झालेल्या मतदानाचा अर्थ काय?

Assembly Elections Result : विधानसभा निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबररोजी पार पडलं. या निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहेत. त्यापूर्वी आता राज्यात एक्झिट पोलची चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र अशातच आता आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 65.11 टक्के मतदान झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता सर्व मतदारसंघांची सविस्तर आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये राज्यातल्या 15  मतदारसंघांमध्ये 5 वाजेनंतर तब्बल दहा टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे मतदान कुणाच्या फायद्याचं ठरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा Prakash Ambedkar : "...तर आम्ही त्यांची साथ देऊ", निकाल लागण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केला पाठिंबा

निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार संगमनेर, श्रीरामपूर, जळगाव, अकोल्यासह अनेक महत्वाच्या मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेनंतर तब्बल 10 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचं समोर आलं आहे. या आकडेवारीमुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. यामध्ये विशेषत: ग्रामीण भागातील मतदारसंघांचा जास्त समावेश आहे. या 13 मतदारसंघांपैकी 11 मतदारसंघ ग्रामीण भागातले आहेत. 

5 वाजेनंतर 10 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले मतदारसंघ

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  मतदारसंघांचं नाव    5 वाजेनंतर मतदान
1 अमळणेर   ग्रामीण   10.51
2 अकोट शहर 10.57
3 धामणगाव रेल्वे ग्रामीण 10.01
4 तिवसा ग्रामीण 13.89
5 आर्णी ग्रामीण 10.66
6 भोकर ग्रामीण 14.81
7 नायगाव शहर 11.52
8 फुलंब्री ग्रामीण 10.50
9 चांदवड ग्रामीण 10.69
10 संगमेनर ग्रामीण 10.44
11 श्रीरामपूर ग्रामीण 11.70
12 करवीर   शहर 12.61
13 हातकणंगले ग्रामीण 10.40
14 पंढरपूर ग्रामीण 15.28
15 पळूस कडेगाव ग्रामीण 13.03

राज्यात उशिरा होणाऱ्या सर्वात जास्त मतदानामध्ये पंढरपूर मतदारसंघ सर्वात पुढे असल्याचं दिसून आलं आहे. 

 

ADVERTISEMENT

दरम्यान, उशिरा होणाऱ्या मतदानाचा नेमका अर्थ शोधायचा झाल्यास असं लक्षात येतं की, बहुतांश मतदारांना सुट्टी असते ते दिवसभरात आणि विशेषत: सकाळीच मतदान करण्यास प्राधान्य देतात, मात्र अनेक ठिकाणी ग्रामीण भागात दिवसभरातला कल पाहून मतदार बाहेर पडतात. विशेषत: अनेक ठिकाणी पैसे वाटप केल्यानंतर मतदान केल्या जात असल्याचाही करण्यात आला आहे. त्यामुळे या उशिरा झालेल्या मतदानाच्या टक्क्याचा कुणाला फायदा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT