Prakash Ambedkar: "...हम सत्ता में रहना चुनेंगे!", निकालापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी उडवून दिली खळबळ
Prakash Ambedkar VBA: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं आणि खळबळ उडवून देणार विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा कुणाला?
राज्यात अपक्ष आणि लहान पक्षांचा बोलबाला राहणार?
मुंबईमध्ये सुरु असलेल्या घडामोडींचा अर्थ काय?
Prakash Ambedkar on Vidhan Sabha Results: मुंबई: राज्याच्या विधानसबभा निवडणुकीचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहेत. आतापर्यंत आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार राज्यात अटीतटीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुतम न मिळाल्यास राज्यात अपक्ष आणि लहान पक्षांचा बोलबोला असणार आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये हालचाली वाढल्या असून, सर्वच पक्षांकडून आपल्या आमदारांना संपर्क करण्यास सुरूवात झाल्याचं कळतंय. काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही मुंबईत पार पडली, तर दुसरीकडे महायुतीही तयार असल्याचं दिसतंय. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राज्यात एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याची वेळ आल्यास आपण कुणाच्या बाजूने असणार हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकरांच्या नव्या भूमिकेने राजकारण बदलणार?
जर उद्या वंचित बहुजन आघाडीला ठराविक जागा मिळाल्या आणि सरकार स्थापन करण्यासाठी कुणाला पाठिंबा देण्याची वेळ आली, तर वंचित कुणाच्या बाजूने राहील असा प्रश्न सध्या वंचितच्या समर्थकांनाही पडला असेल. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी आता हे स्पष्ट केलं असून, अशा परिस्थितीत आपण जो कुणी सत्ता स्थापन करु शकेल, त्यांच्या बाजूने राहणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी आपले दार सर्वांसाठीच खुले केल्याचं दिसतं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Maharashtra Vidhansabha Election 2024: पाहा 288 मतदारसंघाची संपूर्ण आकडेवारी, तुमच्या मतदारसंघात...
उद्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालात येणाऱ्या आकडेवारीवरुन राज्याच्या पुढच्या पाच वर्षांचं भवितव्य ठरणार आहे. त्यामळे जर युती किंवा महाविकास आघाडीला योग्य आकडा गाठता आला नाही, तर ते अपक्ष किंवा लहान पक्षांची मदत घेण्याचा विचार करतील. त्यासाठी चाचपणी देखील सुरु झाल्याचं कळतंय. या सर्व गोष्टी घडत असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांशी कोण संपर्क साधणार हे उद्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
राज्यात समोर आलेल्या वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार महायुतीचं सरकार येईल किंवा अटीतटीची परिस्थिती निर्माण होऊन अपक्ष किंगमेकर ठरू शकतील. त्यामुळे घोडेबाजार टाळण्यासाठीही महाविकास आघाडीचं लक्ष सर्व आमदारांवर असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यासाठीची तयारी सुरू झाली असून, मुंबईतल्या हॉटेलही त्यासाठी बूक केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच बाहेरच्या राज्यातून काँग्रेसचा एक बडा नेता महाराष्ट्रात येणार असून, त्यांच्याकडेच सर्व जबाबदारी असणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे 26 तारखेपर्यंत होणाऱ्या घडामोडींवर देशाचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT