Vidhan Sabha Elections : अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक; महायुती-मविआच्या किती जागा जाहीर होणं बाकी?
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी महाविकास आघाडीकडून 259 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत, तर महायुतीकडून 235 जागांची यादी समोर आली आहे. त्यामुळे अजूनही उरलेल्या जागांवर तिढा कायम असल्याचं समजतयं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाविकास आघाडीकडून 259 जागांसाठी उमेदवार घोषित
महायुतीकडून 235 जागांची यादी समोर
अनेक जागांवर तिढा कायम
राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अवघे काही तास आता अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरुन अजूनही तिढा कायम आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी महाविकास आघाडीकडून 259 जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत, तर महायुतीकडून 235 जागांची यादी समोर आली आहे. त्यामुळे अजूनही उरलेल्या जागांवर तिढा कायम असल्याचं समजतयं. (Maharashtra Vidhan Sabha elections Nomination filing and seat sharing update)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Amit Thackeray : खळखट्याकमध्ये मनसैनिकांवर गुन्हे, तसे तुमच्यावर किती गुन्हे? अमित ठाकरे म्हणाले एकही नाही, कारण...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यंदाही प्रत्येक पक्षात आणि युती-आघाड्यांमध्ये जागा वाटपावरुन खलबतं झाले. मात्र त्यानंतरही अजून काही जागांवरचं चित्र स्पष्ट नाही. महायुतीच्या 235 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, तब्बल 53 उमेदवारांची यादी घोषित होणं बाकी आहे. तर महाविकास आघाडीने 259 उमेदवारांची घोषणा केल्यामुळे त्यांच्याही 29 जागांचा निर्णय बाकी आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही, तिथल्या इच्छुकांसाठी पुढचे काही तास धाकधूक वाढवणारे असणार आहेत.
हे वाचलं का?
कोणत्या पक्षाने किती जागा जाहीर केल्या?
महाविकास आघाडी :
शिवसेना उद्धव ठाकरे | 84 |
काँग्रेस | 99 |
राष्ट्रवादी शरद पवार | 76 |
मविआने जाहीर केलेल्या एकूण जागा | 259 |
उर्वरीत जागा | 29 |
महायुती :
भाजप | 121 |
शिवसेना | 49 |
राष्ट्रवादी | 49 |
महायुतीने जाहीर केलेल्या एकूण जागा | 235 |
उर्वरीत जागा | 53 |
दरम्यान, राज्यातील बडे नेते आज फॉर्म दाखल करत आहेत.तसंच पुढच्या काही तासांमध्ये उरलेले उमेदवार देखील घोषित होतील. त्यामुळे या उमेदवारांसमोर लवकरात लवकर फॉर्म भरण्याचं आव्हान असणार आहे. 29 ऑक्टोबर हा फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस असणार आहे. तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात होणार निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत. 20 नोव्हेंबरला राज्यातल्या 36 जिल्ह्यातले 9 कोटी 36 लाख मतदार आपला हक्क बाजवतील. तर 26 नोव्हेंबरला यंदाच्या विधानसभेचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे अवघ्या 3 दिवसात नवं सरकार स्थापन करणं आवश्यक असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT