Satej Patil: काल ढसाढसा रडले, पण ठाकरेंनी आज सतेज पाटलांना खुदकन हसवलं!
Maharashtra Assembly Election 2024 Satej Patil: कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराबाबत अभूतपूर्व गोंधळ झाल्याने काँग्रेस नेते सतेज पाटील यांना रडू कोसळलं. पण आजच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी त्यांना चांगलंच हसवलं.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाचा अभूतपूर्व गोंधळ
मधुरिमाराजेंनी काँग्रेसचा अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटलांना अश्रू अनावर
सतेज पाटलांना भर सभेत ठाकरेंनी कसं हसवलं?
Satej Patil Kolhapur: कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election 2024) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर अत्यंत अनपेक्षित घटना घडली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ज्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचं पंजा हे चिन्हच नाहीसं झालं. या सगळ्या घटनेनंतर कोल्हापूरमधील काँग्रेस नेते सतेज पाटील हे अक्षरश: ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं. पण आज दुसऱ्याच दिवशी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत सतेज पाटलांना खुदकन हसवलं. (maharashtra election 2024 kolhapur congress leader satej patil cried profusely yesterday but uddhav thackeray made smile today)
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सुरुवातीपासूनच काँग्रेसकडून घोळ घातला गेल्याचं पाहायला मिळालं. पहिल्यांदा या मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण त्यानंतर दुसऱ्या यादीत त्यांचं तिकीट कापत मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या राजेश लाटकरांनी बंडाचं निशाण फडकवलं आणि अपक्ष अर्ज भरला.
हे ही वाचा>> Sharad Pawar : बारामतीच्या कारभाऱ्यासाठी 30-30 चा फॉर्म्युला... युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत काय म्हणाले शरद पवार?
असं असताना, काल (4 नोव्हेंबर) अचानक मधुरिमाराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर राजेश लाटकर हे मात्र अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. या सगळ्या प्रकारामुळे आता या मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा उमेदवारच नसल्याचं चित्र निर्माण झालं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पण हा सगळा प्रकार सतेज पाटील यांच्यासाठी अत्यंत क्लेषदायक ठरला. त्यामुळे सुरुवातीला सतेज पाटलांनी मीडिया समोरच आपला राग व्यक्त केला. तर त्यानंतर रात्री एका सभेत बोलताना सतेज पाटलांना आपले अश्रू अनावर झाले आणि ते अगदी ढसाढसा रडले.
मात्र, आज (5 नोव्हेंबर) सतेज पाटील हे उद्धव ठाकरेंच्या कोल्हापूरमधील जाहीर सभेत सहभागी झाले. जिथे उद्धव ठाकरेंनी त्यांना पुढे बोलावून एक मोठी जबाबदारी दिली. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर हसूही फुलवलं.
ADVERTISEMENT
सतेज पाटलांवर ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी, म्हणाले...
'एका गोष्टीचं मला आणखी बरं वाटलं की, सतेज सोबत आहेत. सतेज इकडे या... सतेज तुमचं नाव घेतल्यावर उत्साह पाहिला का? मी एक गोष्ट चांगली झाली असं का म्हटलं.. की, इथल्या विजयाची जबाबदारी मी आता सतेजवरच टाकतोय. (यावेळी सतेज पाटलांच्या चेहऱ्यावरही हसू फुललं) नाही ही जबाबदारी आता घ्यायला पाहिजे. शाहू महाराजसोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद सोबत आहेत.' असं म्हणत ठाकरेंनी सतेज पाटलांना बळ देण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
शिंदे सरकारवर तुफान टीका
'हे असं वातावरण असलं की, खरंच मन भरून येतं.. तुमच्या मनामध्ये जो राग आहे तो गेली अडीच वर्ष आपण धगधगत ठेवला होता. की, कधी एकदा वेळ येते आणि या खोके सरकारला जाळून भस्म करतो. ही वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. तो क्षण आता आला आहे.'
हे ही वाचा>> Bhau Kadam : अजितदादांना भाऊंची साथ... भाऊ कदम दिसणार अजितदादांच्या प्रचारात? म्हणाले, एकच वादा...
'तुमच्याकडे मी न्याय मागायला आलो आहे. मी माझ्यासाठी लढत नाहीए. मी तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी लढतोय. नाहीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ शकलो असतो. त्यांना जर का 50 खोके दिले तर मी अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर काय झालं असतं?'
'पण ही गद्दारी माझ्या रक्तात नाही, हा हरामखोरपणा माझ्या रक्तात नाही. मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकला जाणाऱ्यातील नाही, त्या औलादीचा मी नाही. मला आश्चर्याचा धक्का बसला.. केपी पाटील सांगत होते की, इथलं पाणी अदानीला विकलं.. अरे मला वाटत होतं मुंबईच अदाणीला विकली की काय.. पण इथलं पाणी अदाणीला विकलं जातं. संपूर्ण महाराष्ट्र अदाणीला विकला जातोय किंवा फुकट दिला जातोय. आम्ही काय षंढ म्हणून हे बघत बसणार?' अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.
ADVERTISEMENT