Vidhan Sabha Election : '...तर 288 उमेदवार पाडले म्हणून समजा', जरांगेंनी थोपटले दंड

मुंबई तक

ADVERTISEMENT

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान केले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीबद्दल भूमिका

point

महायुतीला मनोज जरांगे यांचा इशारा

point

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

Manoj Jarange, Maharashtra Vidhan Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेल्या महायुतीच्या चिंतेत मनोज जरांगे पाटील यांनी भर घातली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आता महायुतीला थेट 288 जागा पाडण्याचा इशारा दिला आहे. (Manoj Jarange Patil has warned the Mahayuti that they will defeat 288 candidates in the Maharashtra assembly elections 2024)

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागली आहे. पण, मराठवाड्यात अत्यंत निर्णायक असलेल्या जरांगे फॅक्टर पुन्हा विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार असे दिसत आहे. त्यातच आता जरांगेंनी महायुतीला इशारा दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीबद्दल मनोज जरांगे काय म्हणाले?

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली लातूरमध्ये आली असताना मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदीबद्दल भूमिका मांडली. जरांगे म्हणाले, 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मराठ्यांची लेकरे अधिकारी झालेले तुम्हाला पाहवत नाही का? एकही कुणबी नोंद रद्द केली, तर 288 उमेदवार पाडले म्हणून समजा. छगन भुजबळ यांचे ऐकून काम करू नका.

हेही वाचा >> महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? जरांगेंचा पहिल्यांदाच मोठा दावा

"सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा. त्यातून कुणी राहिलेच तर त्यांनाही आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना म्हणजे मागेल त्याला प्रमाणपत्र द्यावे. सरकारने तसे आश्वासन दिले आहे", असे मनोज जरांगे म्हणाले. 

महायुतीसमोर नवा पेच

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मनोज जरांगे यांची मागणी आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना तसे जात प्रमाणपत्र देण्याची मागणीही केली गेली. त्यावर सरकारने कामही सुरू केले आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> एकनाथ शिंदे ओबीसी मुद्द्यावरून सापडले खिंडीत?

मनोज जरांगे यांच्या मागण्यांना ओबीसी समाजातून विरोध होत आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे. त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. दुसरीकडे जरांगे ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीसमोर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेच निर्माण झाला आहे. कारण दोन्ही समाजाला न दुखवता निर्णय घेण्याची कसरत महायुतीला करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT