homepage_banner

Raj Thackeray: "उद्धव ठाकरे काँग्रेस-एनसीपीसोबत गेल्यावर...", पहिल्याच सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Raj Thackeray Latest Speech
Raj Thackeray Latest Speech
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

point

"आमच्याशिवाय त्यांचं सरकार बसू शकत नाही"

point

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray On Uddhav Thackeray:  "ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या. त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादसोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची हमी दिल्याचं अमित शहा म्हणाले होते. उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की, पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. अमित शहांची सभा सुरु असताना उद्धव ठाकरे व्यासपीठावर होते. अमित शहा म्हणाले होते, आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. मग त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा सवाल उपस्थित करत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते डोंबिवलीत मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 

राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले, 2019 चा निकाल लागला आणि त्यांना समजलं की आमच्याशिवाय त्यांचं सरकार बसू शकत नाही. त्यानंतर त्यांनी लगेच पिळायला सुरुवात केली. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद द्या, नाहीतर आम्ही जातो. उद्धव ठाकरे काँग्रेस-एनसीपीसोबत गेल्यावर सर्व फोटोंवरून सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आधीचं हिंदूहृदयसम्राट ही गोष्टच काढून टाकली. शिवसेनेच्या होर्डिंगवर बाळासाहेबांचा फोटो पण हिंदूहृदयसम्राट लिहिलेलं नसायचं. काही होर्डिंग्जवर उर्दूत लिहिलं होतं की जनाब... 

हे ही वाचा >> Ajit Pawar : अजितदादांच्या 8 उमेदवारांविरोधात शिवसेना-भाजपचेच बंडखोर, पाहा कोणकोणत्या जागांवर डोक्याला ताप?

मी ज्या सभा ठेवल्या आहेत, त्या निवडून येणाऱ्या जागांसाठीच ठेवल्या आहेत. गेली पाच वर्ष आपण हा महाराष्ट्र पाहतोय. या महाराष्ट्रात काय चालू आहे? पाच वर्षानंतर परत आपण मतदानाला सामोरं जात आहोत. कोणी कुठेही गेलं नाही. आमचा राजू विधानसभेत एकटा होता. मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. माझा आमदार हा विकणारा नाही, तर टीकणारा होता. नाहीतर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे जाऊन बसला असता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Laxman Hake : जरांगेंची विधानसभेतून माघार, लक्ष्मण हाके आक्रमक, म्हणाले, "गनिमी काव्याचा...

एकटाच तर होता. असल्या गोष्टी माझ्या सहकाऱ्यांना शिवत नाहीत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष..2019 ला निवडणुका झाल्या. 2019 ला निवडणुका संपल्या. निकाल लागले..त्यानंतर सकाळचा शपथविधी झाला. पंधरा मिनिटात लग्न तुटलं. कारण काकाने डोळे वटारले. मग घरी लगेच आले आणि म्हणाले काका मला माफ करा, असंही राज ठाकरे म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT