Election 2024: तिकीट न मिळाल्याने श्रीनिवास वनगा 36 तासांपासून होते बेपत्ता! नेमकं घडलं तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Palghar Mla Shrinivas Vanga Latest News
Shivsena Mla Shrinivas Vanga
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता का झाले?

point

शिंदे गटाने तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्यासोबत काय घडलं?

point

श्रीनिवास वनगा माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

Shrinivas Vanga Latest News: राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी येत्या 20 नोव्हेंबरला सुरु होणार आहे. या निवडणुकीत विजयी झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय. ज्या नेत्यांना तिकीट मिळालं, त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करून अर्जही भरले आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांनी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वनगा यांनी शिंदेच्या शिवसेनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली. शिंदेवर नाराज झालेले वनगा 36 तासांपासून बेपत्ता होते. वनगा रात्री घरी 3 वाजता पोहोचल्यानंतर कुटुंबियांशी त्यांनी चर्चा केली आणि पुन्हा दोन दिवसांसाठी ते बाहेर गेल्याचं समजते.

शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट न मिळाल्याने पालघरचे आमदार श्रिनीवास वनगा बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केला होता. पण पोलिसांना वनगा यांचा शोध घेता आला नाही. वनगा यांचे दोन्ही फोन बंद होते. वनगा गायब असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना चिंता लागली होती. शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवून सत्तेत येणाऱ्या शिंदे गटात वनगा यांचा समावेश होता.

हे ही वाचा >>  ladki Bahin Yojana: महिलांनो! खरंच दिवाळी बोनसचे 5500 मिळणार होते? काय आहे नेमकं सत्य?

परंतु, विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने वनगा यांनी शिंदे गटावर टीका केली आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. तिकीट न मिळाल्यानंतर नाराज झालेल्या वनगा यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं, "एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या पक्षात सामील झालो, ही मोठी चूक झाली".

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Congress Song : यंदा पंजा, यंदा पंजा... काँग्रेसचं प्रचारगीत, नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? का होतेय चर्चा?

शिवसेनेकडून 2019 मध्ये लढवली होती निवडणूक

श्रिनीवास वनगा दिवंगत भाजप खासदार चिंतामन वनगा यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर वनगा यांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. "माझ्या वडिलांपासून केलेलं प्रामाणिकपणाचं हेच फळ मिळतंय का..मला प्रत्येक वेळी डावललं. खासदारकीच्या वेळीही तसच केलं. तू निवडून येत नाही, असं मला सांगितलं. मी प्रामाणिकपणे थांबलो. पण प्रत्येक वेळी गावितला पुढं केलं. मतदारसंघात चांगलं काम केल्यानंतर संधी मिळते आणि अशाप्रकारे मला डावललं जातं, अशी प्रतिक्रिया वनगा यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT