Prithviraj Chavan : एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 आणि दुसरीकडे... थोरातांच्या कन्येवरील टीकेचा चव्हाणांकडून समाचार
एका बाजूला लाडक्या बहिणींना पैसे, दुसरीकडे लेकीचा, सुनांचा अपमान करायचा असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी जयश्री थोरात यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जयश्री थोरात यांच्यावरील टीकेचा समाचार
लाडकी बहिणीवर टीका, भाजप नेत्यांवर निशाणा
अर्ज भरताना काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
Maharashtra Vidhan Sabha कराड : एका बाजूला लाडक्या बहिणींना पैसे, दुसरीकडे लेकीचा, सुनांचा अपमान करायचा असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी जयश्री थोरात यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज अर्ज दाखल करत असून त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
25 ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ येथे सुजय विखे-पाटलांच्या जाहीर सभेत एक अत्यंत वादग्रस्त विधान करण्यात आलं. सुजय विखेंचे समर्थक, भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल बोलताना पातळी सोडली. यानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले होते. दरम्यान, याप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी जयश्री थोरात यांनी पोलीस स्थानक गाठलं होतं. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरुन भाजपसह सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. (Prithviraj Chavan reaction on Vasantrao Deshmukh and Sujay Vikhe)
हे ही वाचा >>
हे वाचलं का?
नगरला आपण पाहिलं काय झालं ते.. एका बाजूला 1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींचा आणि सुनांचा अपमान करायचा, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. एकाही भाजप नेत्यानं या विधानाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी भावना व्यक्त केल्या. एकूणच जयश्री थोरात यांच्यावर झालेल्या टीकेनंतर विखे समर्थक भाजपचे नेते वसंतराव देशमुख आणि खुद्द सुजय विखे यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला.
जयश्री थोरातांवर काय टीका केली होती?
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळमध्ये 25 ऑक्टोबरला माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा पार पडली. या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत अश्लाघ्य असं विधान करण्यात आलं. सुजय विखेंचे समर्थक, भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दल बोलताना पातळी सोडली.
'त्यांची कोण ती.. नात काय ती.. बोलते ती म्हणतायत.. माझा सगळ्यांचा बाप.. माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे.. काय कळत नाही... अरे तुला सुद्धा पोरं कसे झालं प्रश्नय.. आपल्या कन्येला समजवा.. आपल्या कन्येला समजवा.. नाहीतर आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही.'
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT