Uddhav Thackeray: 'तुमच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर..', ठाकरेंचं CM शिंदेंना आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंचं CM शिंदेंना आव्हान
उद्धव ठाकरेंचं CM शिंदेंना आव्हान
social share
google news

Shiv Sena UBT: मुंबई: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना (UBT) चा जाहीर मेळावा पार पडला. ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना असंही आव्हान दिलं की, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह न वापरता आमच्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी. (put your father photo and come in front of the election shiv sena ubt chief uddhav thackeray challenge to cm eknath shinde)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्र चांगलं यश मिळालं तर  महायुतीला कमी जागांवर समाधान मानावं लागलं. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर बरंच तोंडसुख घेतलं.

हे ही वाचा>> Sanjay Raut : राऊतांचा PM मोदींना टोला, ''मोदी हा ब्रँड होता, आता...''

उद्धव ठाकरेंची CM शिंदेंवर तुफान टीका 

'जर तुम्ही षंढ नसाल, तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता.. माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासोबत निवडणूक लढवून दाखवा. नाही तर षंढ म्हणून गावात फिरा, विजेता म्हणून फिरू नका.. मला अभिमान आहे.. एका गोष्टीचा मला अभिमान आहे की, शिवसेनाप्रमुखांशिवाय आम्ही कोणाचाही फोटो वापरला नाही.. आणि वापरणारही नाही. मोदींचा तर नाहीच नाही..' 

हे वाचलं का?

'मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय.. विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आतापासून सुरू करा. मी आहे आणि तुम्ही आहात... फक्त या षंढांना बाजूला ठेवा..' 

हे ही वाचा>> 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं येईल सरकार', भाजपचं टेन्शन वाढलं!

'नाव चोरायचं नाही, वडील चोरायचे नाहीत. धनुष्यबाण चोरायचं नाही, धनुष्यबाण बाजूला ठेवा.. नवीन निशाणी घ्या.. मिंध्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर..' 

'अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही.. षंढ कुठले.. यांच्याकडून आपल्या राज्याचं काही भविष्य होणार आहे?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT