Rajesh Latkar : सतेज पाटलांवर नाराजी? मुख्यमंत्री शिंदेंचा फोेन आला? कोल्हापुरातील राड्यानंतर राजेश लाटकर पहिल्यांदा बोलले
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी सतेज पाटील हे चांगलेच संतापले होते. यादरम्यान आणखी एका व्यक्तिवर सर्वांचं लक्ष होतं, ती म्हणजे राजेश लाटकर.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोल्हापुरातील राड्यानंतर राजेश लाटकर पहिल्यांदा बोलले
नॉट रिचेबल असल्याचा दावा फेटाळला
सतेज पाटील, शाहू महाराजांबद्दल काय म्हणाले?
Rajesh Latkar Kolhapur North : पक्षबदल करण्याचा काही विचार आहे का? असा प्रश्न करत एक निरोप काही लोकांनी मला दिला होता अशी माहिती राजेश लाटकर यांनी दिली आहे. राजेश लाटकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती, मात्र ती नंतर पुन्हा बदलून मधुरिमा राजे यांना देण्यात आली होती. या सर्व घटनांमुळे कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच काल मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघात मोठा रा़डा झाल्याचं पाहायला मिळालं. या सर्व घटनांमुळे सतेज पाटील हे संतप्त झाल्याचं दिसले. त्यानंतर संध्याकाळी आपल्या समर्थकांशी संवाद साधताना ते भावूकही झाले होते. या सर्व घटनाक्रमानंतर आता राजेश लाटकर माध्यमांमसोर आले आणि बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Raj Thackeray Vs Eknath Shinde : शिंदे मुलाखतीत बोलले, आता राज ठाकरे भर सभेत बरसले; माहिममुळे अंतर वाढलं? वाचा सविस्तर
मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी सतेज पाटील हे चांगलेच संतापले होते. यादरम्यान आणखी एका व्यक्तिवर सर्वांचं लक्ष होतं, ती म्हणजे राजेश लाटकर. कारण याच राजेश लाटकर यांची उमेदवारी काढून ती मधुरिमा राजे यांना दिली होती. त्यामुळे आता राजेश लाटकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं होतं. यादरम्यान राजेश लाटकर नॉट रिचेबल असल्याचंही बोललं जात होतं. मात्र राजेश लाटकर यांनी माध्यमांसमोर आल्यावर आपण नॉट रिचेबल नव्हतो तर देवदर्शनासाठी गेलो होतो असं सांगितलं.
हे वाचलं का?
राजेश लाटकर काय म्हणाले?
"मी नॉट रिचेबल नव्हतो, मी कुलदैवताच्या दर्शनाला गेलो होतो. घटनेनं दिलेल्या अधिकारानुसार निवडणुकीला सामोरं जायचं म्हणून मी हातात संविधान घेतलंय असं म्हणत राजेश लाटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसकडे अर्ज करून, डिपॉझिट २० हजार रुपये भरून, मुलाखत दिली. त्यानंतर शाहू महाराज, सतेज पाटील, मालोजीराजै यांनी सर्वांनी ठरवलं होतं की, कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा आणि मला उमेदवारी द्यायची. तिसऱ्या यादीत माझं नावंही जाहीर झालं. रात्री ११ वाजता नाव आलं, मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी 28 ऑक्टोबरला माझी उमेदवारी बदलून मधुरिमा राजे यांना दिली. मला बंटीसाहेबांनी, मालोजीराजेंनी बोलवून सांगितलं की, या परिस्थितीत आपल्याला थांबावं लागेल. मात्र मालोजीराजेंकडे जे पत्र देण्यात आलं होतं त्या खोट्या सह्या होत्या. माझा विरोध होता तर पक्ष कार्यालयात मला सन्मानाने सांगितलं असतं की नाव बदलावं लागेल तर मी पक्षाचा आदेश मानला असता. मात्र माझी, माझ्या कुटुंबाची बदनामी करण्यात आली, मिडिया ट्रायल करण्यात आली. त्यामुळे आता आत्मसन्मान जपण्यासाठी मी सर्वांना सांगून अपक्ष फॉर्म भरला. मात्र मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता आहे, मी बंटी पाटील, शाहू महाराजांना दोष देणार नाही, पण मालोजीराजेंनी मला एकदा विचारायला पाहिजे होतं" असं राजेश लाटकर म्हणाले.
आपल्याला यादरम्यान काही मंडळींकडून निरोप आला की, आपल्यावर अन्याय झालाय, आपला पक्ष बदलण्याचा विचार आहे का? या लोकांनी आपल्याला काही लोकांची भेट घालून देतो असंही राजेश लाटकर यांनी सांगितलं. तसंच या निवडणुकीत आपण प्रेशन कूकरचं चिन्ह घेणार असंही लाटकर म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT