Maharashtra Assembly Election 2024 Result : लाखाच्या लीडने जिंकणाऱ्या आमदारांची यादी; अजितदादा, शिंदेंचा नंबर कितवा?
मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे, मात्र आणखी एका गोष्टीची चर्चा होते आहे, ती म्हणजे राज्यात सर्वात जास्त मताधिक्क्यानं निवडून येणाऱ्या आमदारांची!
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सर्वाधिक मताधिक्क्यानं जिंकणारा पहिला आमदार कोण?
अजित पवार 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्यानं जिंकले
राज्याच्या विधानसभा निवडणुका काल जाहीर झाल्या. यामध्ये महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीला फक्त 49 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि महायुतीसाठी यंदाचा विजय हा मोठं यश आहे. राज्यात मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या घडामोडी पाहता यंदाच्या निवडणुकीबद्दल अंदाज व्यक्त करताना अनेकजण चुकले. मात्र त्यानंतर आता महायुतीला मोठं यश मिळालं असून, उद्या या सरकारचा शपथविधीही पार पडणार आहे. सर्वांचं लक्ष सध्या मुख्यमंत्री कोण होणार याकडे असतानाच, आणखी एका गोष्टीची चर्चा होते आहे. राज्यात सर्वात जास्त मताधिक्क्यानं निवडून येणाऱ्या आमदारांची सध्या चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
1. काशिराम पावरा
शिरपूर मतदारसंघातून काशिराम पावरा हे तब्बल 1 लाख 45 हजारांच्या मताधिक्क्यानं निवडून आले आहेत. त्यांची लढत ही एकतर्फी असल्याचं पाहायला मिळतंय.
हे वाचलं का?
2. शिवेंद्रराजे भोसले
सातारा विधानसभा मतदारसंघाची लढत यंदा चर्चेत होती. कारण ही लढत अत्यंत एकतर्फी होणार, असा अनेकांचा अंदाज होता. शेवटी तसंच घडलं आणि भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसले हे तब्बल 1 लाख 42 हजार 124 च्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. शिवेंद्रराजे यांना एकूण 1 लाख 76 हजार 849 मतं मिळाली आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमित कदम मैदानात होते.
ADVERTISEMENT
3. धनंजय मुंडे
ADVERTISEMENT
राज्याचे कृषीमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा निवडणुकीवर यंदा सर्वांचं लक्ष होतं. कारण काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यांच्या पराभवाला जरांगे फॅक्टर कारण असल्याचं बोललं जात होतं. त्याच जरांगे फॅक्टरचा फटका धनंजय मुंडेंनाही बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मुंडे निवडून आले. तब्बल 1 लाख 40 हजार 224 च्या मताधिक्क्यानं निवडून आलेत. त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेसाहेब देशमुख मैदानात होते.
4. दिलीप बोरसे
बागलाणमधून भाजपचे दिलीप बोरसे 1 लाख 29 हजार मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत.
5. आशुतोष काळे
कोपरगावातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी 1 लाख 24 हजार मताधिक्क्यानं निवडून आलेत.
हे ही वाचा >>Daund Pune : साहेब आमदार झाले, विजयाचा जल्लोष करताना हृदयविकाराच्या झटक्यानं समर्थकाचा मृत्यू
6. एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखाडीत 1 लाख 20 हजारांच्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. त्यांच्याविरोधात केदार दिघे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मैदानात होते.
7. कृष्णा खोपडे
नागपूर पूर्वमधून भाजपच्या कृष्णा खोपडे यांनी 1 लाख 15 हजार मताधिक्यानं7.
8. चंद्रकांत पाटील
भाजपचे नेते आणि राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरुड विधानसभा मतदारसंघातून यंदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात ठाकरेंचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे त्यांच्याविरोधात होते. पण तब्बल 1 लाख 12 हजार 41 मतं घेत चंद्रकांत पाटील जिंकले.
9. प्रताप सरनाईक
ओवळा माजीवाड्यात शिंदेंचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तब्बल 1 लाख 9 हजारांचं मताधिक्य घेत विजय मिळवला.
10. सुनील शेळके
मावळ विधानसभा मतदारसंघाची विधानसभा निवडणूक यंदा गाजली ती भेगडे आणि शेळके यांच्या वादामुळे. माजी मंत्री आणि भाजप नेते बाळा भेगडे यांच्या गटाचा शेळकेंना विरोध होता. मात्र तरीही सुनील शेळके हे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना तब्बल 1 लाख 8 हजार 565 मतं मिळाली आहेत.
11. केवलराम काळे
मेळघाटचे भाजपचे आमदार केवलराम काळे यांनी 1 लाख 6 हजार मताधिक्क्यानं विजय मिळवला.
12. दादा भुसे
मालेगाव बाह्यमधून माजी मंत्री दादाजी भुसे 1 लाख 6 हजार मताधिक्क्यानं निवडून आले आहेत.
13. शंकर जगताप
चिंचवडचे भाजपचे आमदार शंकर जगताप 1 लाख 3 हजार, मतांनी निवडून आले आहेत.
हे ही वाचा >>NCP MLA Winners List 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी
14. अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा लढा यंदा अटीतटीचा ठरेल अशी शक्यता होती. कारण विरोधात स्वत: शरद पवार यांचे उमेदवार युगेंद्र पवार होते. हा लढा अप्रत्यक्षपणे युगेंद्र पवार विरुद्ध शरद पवार असा होता. त्यामुळे राज्यासह देशाचं लक्ष या लढ्यावर होतं. मात्र, अजित पवार तब्बल 1 लाख 899 मतांनी ते विजयी झाले आहेत.
15. संजय उपाध्याय
बोरिवलीतून भाजपचे उमेगदवार संजय उपाध्याय यांनी 1 लाख 257 मतांनी विजय मिळवलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT